शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

CoronaVirus News : कोरोना वेगाने पसरतोय! 'या' देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 09:54 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. पुन्हा एकदा देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्याने प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे.

फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान शाळा आणि काही कामाची कार्यालयं सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊनच्या नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे युरोपमधील रुग्णालयं आता अपुरी पडत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे देशात सध्या कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. शुक्रवारपासून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. 

फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक

लॉकडाऊनमध्ये फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. कारखाने, शेती आणि बांधकाम यांचे काम चालू ठेवता येईल. याशिवाय नर्सिंग होमसुद्धा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत फ्रान्सचा 5 वा क्रमांक आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार. मंगळवारी कोरोनामुळे फ्रान्समध्ये 530 लोकांचा मृत्यू झाला. तर 33 हजार 417 रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक आहे. तर आतापर्यंत 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 

फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू

फ्रान्समध्ये 1 लाख 13 हजार रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. 10 लाखहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  फ्रान्समध्ये आता कोरोनाची दुसरी लाट पसरायला सुरुवात झाली आहे. या लाटेचा फटका जास्तीत जास्त लोकसंख्येला बसू नये यासाठी काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली. 

"कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य"

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याआधी सध्याच्या स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. याशिवाय पॅरिसमध्ये आणि कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा केली आहे. मॅक्रॉन यांनी 9 शहरांमधील रहिवासीयांना रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत त्यांच्या घरी रहावे, असे आवाहन केले होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्सDeathमृत्यू