शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 15:14 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 69,925 बळी  घेतले आहेत.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 252,675 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 36 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,660,055 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,203,850 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 69,925 बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 29 हजार 079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 25 हजार 428 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 हजार 201 जणांचा तर ब्रिटनमध्ये 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात 1,571, जर्मनीत 6,993, रशियामध्ये 1,451, चीनमध्ये 4,633, इराणमध्ये 6,277, तुर्कीमध्ये 3,461जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे 1,154 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोना (कोविड-19) बाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी, कोरोनाला परताविणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्यांमधे अगदी सोळा दिवसांच्या नवजात अर्भकापासून ते नव्वदीवरील ज्येष्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाला परतावून लावले आहे. बाधितांपैकी जवळपास 97 टक्के रुग्णांमधे कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 1074 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे आता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 27.52 टक्के असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीनItalyइटलीFranceफ्रान्सDeathमृत्यू