शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 12:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 234,133 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2,34,133 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 33 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,308,901 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,042,993 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. 

कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 63,871 बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत  असून तब्बल 1,095,304 कोरोनाग्रस्त आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 27,967 कोरोनाग्रस्त असून 27 हजार, 967 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 24 हजार 543 वर गेला असून रुग्णांची संख्या 24,543 आहे. फ्रान्समध्ये 24,376 तर  ब्रिटनमध्ये 26,771 कोरोनाग्रस्त आहेत. कोरोना व्हायरसमुळे फ्रान्समध्ये 24 हजार 376 जणांचा तर ब्रिटनमध्ये 26 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात 35,043, जर्मनीत 163,009, रशियामध्ये 106,498, चीनमध्ये 82,874, इराणमध्ये 94,640, तुर्कीमध्ये 120,204 कोरोनाग्रस्त आहेत. भारतात कोरोनामुळे 1,154 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोना (कोविड-19) बाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी, कोरोनाला परताविणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्यांमधे अगदी सोळा दिवसांच्या नवजात अर्भकापासून ते नव्वदीवरील ज्येष्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाला परतावून लावले आहे. बाधितांपैकी जवळपास 97 टक्के रुग्णांमधे कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 33 लाखांवर गेली असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. अमेरिकेत बाधितांची संख्या दहा लाखांवर गेली असली, तरी तेथील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल 1 लाख 47 हजार आहे. तर, सव्वादोन लाखांहून अधिक रुग्ण असलेल्या स्पेनमधील सव्वा लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. इटली 71 हजार आणि फ्रान्समधील पन्नास हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीतील एक लाख 60 हजारांपैकी 1 लाख 20 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीमधे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक दिलासा देणारा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! जगभरात आतापर्यंत दहा लाख रुग्णांची झाली कोरोनातून मुक्तता!

CoronaVirus News : "...तर येत्या 3 महिन्यांत कोरोनावर लस उपलब्ध होणार"

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारतFranceफ्रान्सchinaचीनItalyइटलीDeathमृत्यू