CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:32 PM2020-05-11T18:32:13+5:302020-05-11T18:52:58+5:30

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच जवळपास सर्वच देशांमध्ये देशांतर्गत स्थितीत संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील अनेक नेते लॉकडाउनमध्ये सूट देण्याबरोबरच कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातही जगाला जागृत करत आहेत. 

CoronaVirus Marathi News America politicians fear second round of corona virus vice president mike pence went to isolation | CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये

CoronaVirus News : अमेरिकन नेत्यांना वाटतेय कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, उपराष्‍ट्रपती आयसोलेशनमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्दे...तर 10 दिवसांच्या आत मृत्यू आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकतेअमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स 'एकांतवासात' गेले आहेतअमेरिकेत एकूण संख्या 3.35 कोटी लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे

ह्यूस्टन : कोरोना व्हायरसचा प्रकोप लवकरच पुन्हा येण्याची भीती अमेरिकन प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना वाटते. व्हाइट हाऊसमध्येही कोरोना शिरल्याचे पाहायला मिळत आहे. एका सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स 'एकांतवासात' गेले आहेत. 

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच जवळपास सर्वच देशांमध्ये देशांतर्गत स्थितीत संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील अनेक नेते लॉकडाउनमध्ये सूट देण्याबरोबरच कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातही जगाला जागृत करत आहेत. 

आणखी वाचा - CoronaVirus News : आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा

अमेरिकेची अर्थव्यवस्था दुसऱ्या सहामाहीमध्ये बेरोजगारी दर कमी करून मंदीतून सावरेल, असा अंदाज अर्थमंत्री स्टिवन मनूशीन यांनी वर्तवला आहे. गेल्या आठवड्यात 32 लाख लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला होता. गेल्या सात दिवसांत अशा लोकांची एकूण संख्या 3.35 कोटी एवढी झाली आहे. 

मनूशीन म्हणाले, ‘माझ्या मते अर्थ व्यवस्थेत उसळी बघायला मिळू शकते,' मात्र, कोरोना व्हायरस प्रतिमान तयार करणाऱ्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या एका संस्थेच्या प्रमुखांनी म्हटले आहे, की कामकाज सुरू केल्यानंतर 10 दिवसांच्या आत मृत्यू आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते.” इंस्टिट्यूट फॉर हेल्थ मिट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनच्या डॉ. ख्रिस्तोफर मुर्रे यांनी म्हटले आहे, की जेथे मृत्यू आणि कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यांत इलिनोइस, एरिजोना आणि कॅलिफोर्निया यांचा समावेश आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन

Web Title: CoronaVirus Marathi News America politicians fear second round of corona virus vice president mike pence went to isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.