CoronaVirus made in Wuhan laboratory paris ngo claims after investigation | CoronaVirus News: कोरोना विषाणू कोणी, कुठे, कसा तयार केला?; धक्कादायक माहिती उघड

CoronaVirus News: कोरोना विषाणू कोणी, कुठे, कसा तयार केला?; धक्कादायक माहिती उघड

बीजिंग : जगभरात हाहाकार माजवलेला कोरोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता व तो सध्या चिनी लष्कराच्या ताब्यात आहे. हा व्हायरस तयार करण्यात केवळ चीनच्याच नव्हे तर फ्रेंच आणि अमेरिकी शास्त्रज्ञांचाही सहभाग होता, अशी माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा व्हायरस हा नैसर्गिकरीत्या तयार झालेला नसून, तो वुहानमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता, असा संशय काही महिन्यांपर्यंत व्यक्त करण्यात येत होता. मात्र, चीनच्या बाजूने असणारांकडून याचा इन्कार केला जात होता. मात्र, आता नवीन माहिती समोर आल्यामुळे चीनचे खरे स्वरूप समोर आले आहे.

कोरोना व्हायरस चीननेच तयार केला व जगभर फैलावला, याला पुष्टी देणारे संशोधन युनेस्कोच्या नेतृत्वाखालील पॅरिस येथील स्वयंसेवी संस्थेने जारी केले आहे. १९९७ मध्ये स्थापन केलेल्या या वर्ल्ड अकॅडमी ऑफ बायोमेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीजचे (डब्ल्यूएबीटी) संस्थाध्यक्ष ६८ वर्षीय जोसेफ ट्रिटो यांनी पुरेशी कागदपत्रे, तारखा, तथ्ये आणि नावांनिशी हा प्रबंध सादर केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus made in Wuhan laboratory paris ngo claims after investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.