शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

CoronaVirus Live Updates : बापरे! चीनमध्ये 3 पाळीव मांजरींना कोरोनाची लागण; प्रशासनाने दिली थेट मृत्यूची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 5:47 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: तीन पाळीव मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 234,175,561 वर पोहोचली आहे. तर 4,790,376 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 210,980,038 लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर ते बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनच्या हार्बिन शहरातील तीन पाळीव मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे. यामुळेच प्रशासनाने त्यांना मृत्यूची शिक्षा दिली आहे. 21 सप्टेंबरला तीन मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मांजरींना अन्न-पाणी देऊन त्यांना आयसोलेशनमध्ये सोडण्यात आलं होतं. यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्यांने तिन्ही मांजरींची पुन्हा कोरोना चाचणी केली. 

चीनमध्ये तीन मांजरी कोरोना पॉझिटिव्ह

मांजरींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मांजरींना मारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मांजरींच्या मालकाने विरोध दर्शवत ऑनलाईन अपिल केलं होतं. मात्र प्रशासनाने काही न ऐकता तिन्ही मांजरींना मारलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी "तिन्ही मांजरींना यासाठी मारलं कारण प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्यास  उपचार उपलब्ध नाहीत. कोरोनाबाधित मांजरी, मालक आणि इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांसाठी धोकादायक ठरत होत्या" असं म्हटलं आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनने प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनDeathमृत्यू