शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

coronavirus: वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले संमेलन; सदस्य उत्साहाने झाले सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 1:56 AM

टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (९ मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले आणि भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसलेही.

टोरोंटो : कोरोनाच्या जागतिक उत्पाताने जगभरातील लोकांना ‘शारीरिक दुरावा’ सक्तीचा केल्याने आता येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय, असा प्रश्न हळूहळू मराठी साहित्य क्षेत्रात मान वर काढत असताना तिकडे पंधरा हजार मैलावरच्या कॅनडातल्या टोरोंटोमध्ये मात्र मराठी मंडळींनी ‘३२ व्या टोरोंटो साहित्य संमेलना’चा डिजिटल मांडव हौसेने आणि कष्टाने सजवला.टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (९ मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट्यांवर लाईव्ह रंगले आणि भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसलेही.खरेतर कोविडने सगळ्यांनाच आता चार भिंतीत कोंडून घातल्याने ‘आॅनलाईन’ मिटिंगांपासून गाणी-नृत्ये आणि अगदी वाढदिवसांच्या कैण्डल लाईट डिनर्सपर्यंत सगळेच ‘व्हर्चुअल’ होते आहे, त्यामुळे साहित्य संमेलन ‘डिजिटल’ होण्यात नवीन ते काय?टोरोंटो साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य असे, की गेल्या बत्तीस वर्षांची उन्हाळी आयोजनाची परंपरा जपणारा हा कॅनडातला मराठी कार्यक्रम कात टाकून ‘न्यू नॉर्मल’चे स्वागत करण्यास तयार झाला आणि जुने-जाणते सदस्यही नव्या रीती शिकून घेऊन त्यात उत्साहाने सहभागी झाले. काही टेक सॅव्ही ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:हून बाकीच्यांना डिजिटल कट्टे लाईव्ह कसे वापरावेत, हे शिकवण्याची जबाबदारी घेतली. या संमेलनासाठी मधुसूदन भिडे, टोरोण्टो मराठी भाषक मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ सरनोबत, सेक्रेटरी वृणाल देवळे, खजिनदार राज गावडे, संमेलनाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य गायत्री गद्रे, निषाद सोमण, अनिल विंगळे, संगणक तज्ञ रोहन भाजेकर, सोशल मीडिया टीम हिरणमय कोपरकर, दुर्गेश खटावकर आणि अमेय गोखले यांचे मुख्य योगदान आहे.दीर्घ परंपराउत्तर अमेरिकेतील हे पहिले मराठी साहित्य संमेलन, मधुसूदन भिडे यांनी ३२ वर्षांपूर्वी, टोरोंटो मध्ये सुरू केले. गेली ३१ वर्षे सातत्याने दरवर्षी मार्च/एप्रिल महिन्यांत या संमेलनाचे आयोजन केले जाते. या वर्षीचे संमेलन ४ एप्रिलला ठरले होते, पण कोरोनामुळे ते अर्थातच रद्द करावे लागले; मग उपाय निघाला ‘डिजिटली’ एकत्र जमण्याचा! हे उत्तर अमेरिकेतील पहिले आॅनलाईन मराठी साहित्य संमेलन ठरले.‘डिजिटल’ मराठी आधार‘परदेशात राहताना आधीच एकलकोंडे आयुष्य असते, त्यात आता कोरोनाने लादलेला सक्तीचा एकांतवास.  गेल्या ३-४ वर्षांत टोरोंटोमध्ये येणाऱ्या मराठी लोकांची संख्या खूप वाढली आहे. कॅनडामध्ये नवीन आलेल्या लोकांसाठी हे वातावरण अधिकच आव्हानात्मक आहे. अशा वेळेस मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो. तो या डिजिटल संमेलनामार्फत देण्याचा आम्ही प्रयत्न केला! - श्रीनाथ सरनोबत,अध्यक्ष, टोरोंटो मराठी भाषिक मंडळसहभागी व्हा... हे साहित्य संमेलन फेसबुकवर लाईव्ह झाले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCanadaकॅनडाSocialसामाजिक