शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मायदेशावर कोरोना संकट! हृदय तुटले, दोन जगज्जेत्या कंपन्यांचे सीईओ मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 10:10 IST

Microsoft, google will Help India in Corona crisis: कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये  (Corona Pandemic) अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारताला कोरोनाने दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) घेरले आहे. अशावेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये  (Corona Pandemic) अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारताला कोरोनाने दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) घेरले आहे. अशावेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला (Microsoft CEO Satya Nadella) यांनी अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google ने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या मदतनिधीमध्ये १३५ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. (Satya Nadella, Sundar Pichai said that his company will continue to use its resources and technology for relief efforts and support buying oxygen devices, 135 crore fund respectively.)

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी, भारतातील कोरोना परिस्थिती पाहून आपले हृदय दुखावले असल्याचे म्हटले आहे. भारतात दिवसाला लाखो रुग्ण सापडू लागले आहेत. आपली कंपनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले. 

तर अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुदर पिचाई (Google and Alphabet CEO Sundar Pichai) यांनी देखील युनिसेफच्या भारतासाठीच्या मदतीच्या फंडामध्ये आपली कंपनी १३५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताला फायदा न घेता वैद्यकीय मदत, कोरोनाच्या प्रसाराची आणि रोखण्याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

अमेरिकेची माघार...भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. या दोघांच्या चर्चेनंतर व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली होर्ने यांनी सांगितले की, अमेरिकेतील हॉस्पिटले कोरोनाच्या सुरुवातीच्या संकटात झगडत होती. तेव्हा भारताने मोठी मदत आम्हाला केली होती. यासारखीच अमेरिकादेखील भारताला या कठीण काळात मदत करण्यासाठी उभा आहे. अमेरिका भारताला रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट देणार आहे.जो बायडेन यांच्या मदतीच्या ट्विटनंतर भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीदेखील ट्विट करून भारताला गरजेच्या उपकरणांची मदत तातडीने दिली जाणार असल्याचे ट्विट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSundar Pichaiसुंदर पिचईgoogleगुगलAmericaअमेरिका