CoronaVirus बापरे! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज तीस हजाराने होतेय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:11 AM2020-04-07T05:11:53+5:302020-04-07T05:13:03+5:30

गेल्या ३६ दिवसांतील चित्र : जगभरातील बाधितांचा आकडा १३ लाखांच्या दिशेने

CoronaVirus increased the number of patients by thirty thousand daily hrb | CoronaVirus बापरे! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज तीस हजाराने होतेय वाढ

CoronaVirus बापरे! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज तीस हजाराने होतेय वाढ

Next

विशाल शिर्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडे २० जानेवारी रोजी वेगळा विषाणूचा आजार असल्याची नोंद चीनने केली. त्यानंतरच्या ७८ दिवसांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा १२ लाख ९७ हजार ४०४ वर गेला आहे. त्यातील १० लाख ८७ हजार ८५५ कोरोनाबाधितांची संख्या १ मार्चनंतर वाढली आहे. म्हणजेच गेल्या ३६ दिवसांमध्ये जगभरात दररोज ३० हजार २८८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, गेल्या सहा दिवसांत सव्वाचार लाख नवे रुग्ण समोर आले आहेत.


चीनच्या हुबेई प्रांतामधून कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) प्रसार जगभर झाला. चीनने ३१ डिसेंबरला जागतिक आरोग्य संघटनेला कोणत्यातरी वेगळ्या विषाणूने न्यूमोनिया बाधितांची संख्या वाढत असल्याचे कळविले. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्यावर लक्ष ठेवून होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या २१ जानेवारी २०२० रोजीच्या अहवालात ‘२०१९-एनकोव्ह’ बाधित रुग्णांची संख्या अवघी २८२ होती. त्यातील २७८ चीनमधील होते. त्यातही हुबेई प्रांतामधे २५८, गुआंगडोंगमधे १४ रुग्णांचा समावेश होता. सुरुवातीला बाधितांची नोंद झालेल्या देशांमधे जपान, रिपब्लिक कोरिया प्रत्येकी १ आणि थायलंडमधे २ रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे झाली.
यानंतर जगभरामधे कोरोनाचा वेगाने फैलाव होत असून, जगातील व्यवहार ठप्प पडले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळत असलेल्या देशांची संख्या चारवरून २०९ पर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत भारतासह २५ देशांमधे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्या वेळी असलेल्या ५० हजार ५८० पैकी ५० हजार ५४ रुग्ण एकट्या चीनमधील होते. अवघे ५२६ रुग्ण इतर देशांमधे आढळून आले. आत्ता सर्वाधिक पावणेतीन लाखांहून अधिक बाधित असलेल्या अमेरिकेमधे तर अवघे १५ रुग्ण होते.

त्यानंतर जगभरामधे प्रचंड वेगाने कोरोनाचा प्रसार झाला. जगभरात १ मार्चपर्यंत ८७ हजार रुग्ण होते. त्यातील ७९,९६८ चीनमधील होते. त्यानंतर मात्र, चीनने ८२ हजारांपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा मर्यादित ठेवल्याचा दावा केला आहे. यानंतर मात्र युरोपासह जगभरामधे वेगाने आकडा वाढला आहे. मार्चच्या १५ तारखेस दीड लाख बाधितांपैकी चीनमधे ८१ हजार आकडा होता. खालोखाल इटलीत २१ हजार बाधित होते. अमेरिकेत १ हजार ६७८ रुग्ण होते. त्यानंतरच्या १५ दिवसांत बाधितांच्या आकड्याचा विस्फोट झाला. मार्चअखेरीस बाधितांची संख्या साडेसात लाखांवर गेला. अमेरिका व इटलीच्या बाधितांची संख्या अनुक्रमे दीड आणि एक लाखावर गेली.
मार्च नंतरच्या सहा दिवसांत सोमवारी (दि. ६) दुपार बाधितांची संख्या पावणेबारा लाखापर्यंत गेली. त्यात सातत्याने वाढ होत आहे. युरोपीय देश आणि अमेरिकेमधे त्यातील सुमारे सात लाख रुग्ण आहे. मार्च नंतरची स्थिती पाहिल्यास जगभरात ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा दिवसांत दररोज ७० हजार ६६०च्या वेगाने बाधितांचा आकडा समोर आला आहे. या सहा दिवसांत ४ लाख २३ हजार ९६५ रुग्ण समोर आले आहेत.


जागतिक आरोग्य संघटनेला चीनने काय सांगितले?
चीनने ३१ डिसेंबरला सांगितले वेगळ्या विषाणूमुळे न्यूमोनिया बाधितांची संख्या वाढत आहे.
हुबेई प्रांतात ३ जानेवारीपर्यंत न्यूमोनिया बाधितांची संख्या ४४ वर.
चीनने ७ जानेवारीला नवीन कोराना विषाणूची बाधा असल्याचे सांगितले.
११ आणि १२ जानेवारी रोजी चीनने वुहानमधील मच्छी बाजारातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा अहवाल दिला.
१२ जानेवारी रोजी कोरोना विषाणूचा जनुकीय क्रम सांगितला; त्यामुळे चाचणी कीट बनविणे शक्य झाले .

Web Title: CoronaVirus increased the number of patients by thirty thousand daily hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.