CoronaVirus: जर्मन वृत्तपत्राकडून चीनला १३ हजार कोटी युरोचे बिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:48 IST2020-04-21T01:22:55+5:302020-04-21T06:48:19+5:30
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता जर्मनीदेखील मैदानात

CoronaVirus: जर्मन वृत्तपत्राकडून चीनला १३ हजार कोटी युरोचे बिल
बर्लिन : ‘कोविड-१९’ही महामारी जगात पसरविण्याबद्दल अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता जर्मनीदेखील मैदानात उतरले आहे. तेथील एका प्रमुख वृत्तपत्राने कोरोना व्हायरस पसरल्यामुळे झालेल्या नुकसानभरपाईची मागणी म्हणून चीनला तब्बल १३ हजार कोटी (१३० बिलियन) युरोचे बिल पाठवले.
जर्मनीतील ‘बिल्ड’ या प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांत ‘जगाला कोरोना व्हायरसच्या संकटाच्या खाईत ढकलल्याबद्दल जर्मनीत चीनविरोधात संतापाची भावना आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. छोटे व्यवसाय : ५० बिलियन, पर्यटन : २७ बिलियन, चित्रपट उद्योग : ७.२ बिलियन, विमानसेवा : प्रति तास प्रति मिलियन याप्रकारे नुकसानीची वर्गवारी करण्यात आली आहे. जर्मनीत प्रति व्यक्ती १,७८४ युरोचे नुकसान झाले,’ असे नमूद केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनीही या संकटासाठी चीनला जबाबदार ठरवले आहे.