Coronavirus: ५६ वर्षापूर्वी ‘या’ महिला वैज्ञानिकाने कोरोनाचा शोध लावला; विषाणूच्या नावामागेही वेगळीच कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:36 AM2020-04-21T10:36:36+5:302020-04-21T10:38:21+5:30

एके दिवशी डॉ. अल्मेडा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्ये पाहत असताना त्यांना एक विषाणू दिसू लागला जो आकाराने गोल होता

Coronavirus: Dr June Almeida the Scientist Who Identified The First coronavirus pnm | Coronavirus: ५६ वर्षापूर्वी ‘या’ महिला वैज्ञानिकाने कोरोनाचा शोध लावला; विषाणूच्या नावामागेही वेगळीच कथा

Coronavirus: ५६ वर्षापूर्वी ‘या’ महिला वैज्ञानिकाने कोरोनाचा शोध लावला; विषाणूच्या नावामागेही वेगळीच कथा

Next
ठळक मुद्देडॉ. जून अल्मेडा यांनी कोरोना विषाणूचा शोध लावलाअल्मेडाला वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडावी लागली होतीकोरोना नाव ठेवण्यामागेही वेगळीच कहाणी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगातील १ लाख ६० हजाराहून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २४ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट पसरलं आहे. बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेत लोकांना घरातच राहण्याची सक्ती केली आहे. काही जण सांगतात की एका प्राण्यापासून हा व्हायरस लोकांमध्ये पसरला तर काहींचा दावा आहे की, हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेत बनवला गेला.

पण कोणाला माहिती आहे का? माणसांमध्ये कोरोना व्हायरसचा शोध कोणी लावला? कोरोना या विषाणूचा शोध ५६ वर्षांपूर्वी १९६४ साली स्कॉटिश व्हायरलॉजिस्ट डॉ. जून अल्मेडा यांनी लावला होता. डॉ. अल्मेडा यांचा जन्म स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील एका अगदी सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील बस चालक होते. या व्हायरसचं नाव कोरोना ठेवण्यामागेही वेगळी कथा आहे.

एके दिवशी डॉ. अल्मेडा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्ये पाहत असताना त्यांना एक विषाणू दिसू लागला जो आकाराने गोल होता आणि त्याच्याभोवती काटे होते. जसे सूर्याच्या किरणासारखे. त्यानंतर या व्हायरसचं नाव कोरोना ठेवले गेले. डॉ. अल्मेडा यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी हा कोरोना व्हायरसचा शोध लावला. बिकट आर्थिक स्थितीमुळे अल्मेडाला यांना वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडावी लागली होती.

वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना ग्लासगो रॉयल इन्फिरमरी येथे लॅब तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. हळू हळू कामात मन रमू लागलं. मग हेच त्यांचे करिअर बनले. काही महिन्यांनंतर, त्या अधिक पैसे मिळवण्यासाठी लंडनमध्ये आली आणि सेंट बार्थोलोम्यूज हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्नीशियन म्हणून काम करू लागली. १९५४ मध्ये व्हेनेझुएलातील कलाकार एरिक अल्मेडाशी लग्नानंतर ती आपल्या पतीसह कॅनडामध्ये गेली. यानंतर जून अल्मेडा यांना टोरंटो शहरातील ऑन्टारियो कर्करोग संस्थेत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तंत्रज्ञ बनविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन ब्रिटनने त्यांना १९६४ मध्ये लंडनमधील सेंट थॉमस मेडिकल स्कूलमध्ये नोकरीची ऑफर दिली.

virus_042020080109.jpg

लंडनमध्ये आल्यानंतर डॉ. जून अल्मेडा यांनी डॉ. डेव्हिड टायरल यांच्यासोबतीनं संशोधन सुरू केले. त्या दिवसांमध्ये, डॉ. टायरेल आणि त्यांची टीम ब्रिटनमधील विल्टशायरच्या सॅलिसबरी भागात सामान्य सर्दी-थंडीचा शोध करत होते. डॉ. टायरल यांनी सर्दीने ग्रस्त लोकांकडून बी-८१४ नावाच्या फ्लूसारख्या विषाणूचे नमुने गोळा करुन जून अल्मेडा यांच्याकडे संशोधनासाठी पाठवले. अल्मेडा यांनी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपद्वारे या विषाणूचा फोटो काढला. एवढेच नव्हे तर दोन एकसारखे व्हायरस मिळाले आहेत. पहिले कोंबडीच्या ब्रोकायटिस आणि दुसरे उंदीर यकृत मधून. त्यांनी एक शोधनिबंधही लिहिला, परंतु छायाचित्रे अत्यंत अस्पष्ट आहेत असं सांगून तो नाकारला गेला.

पण डॉ. अल्मेडा आणि डॉ. टायरल यांना हे माहित होते की ते विषाणूच्या प्रजातीवर काम करत आहेत. मग, एक दिवस, अल्मेडा यांना कोरोना विषाणूचा शोध लागला. काटेरी आणि सूर्याच्या किरणासारखा गोलाकार. त्या दिवशी या विषाणूचे नाव कोरोना व्हायरस ठेवले गेले.

 

Web Title: Coronavirus: Dr June Almeida the Scientist Who Identified The First coronavirus pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.