शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 09:49 IST

मी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावे, अशी चीनची इच्छा नाही. चीनला माझे विरोधक जो बिडेन यांना अध्यक्ष बनवायचे आहे.

वॉशिंग्टनः कोरोनाच्या संकटात अमेरिका आणि चीनमधलं शाब्दिक युद्ध प्रचंड भडकलं आहे. चिनी नेते अमेरिकेवर हल्लाबोल करत असतानाही अमेरिकेच्या नेतृत्वानंही त्याला सडेतोड उत्तर देणं सुरूच ठेवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील कोट्यवधी लोकांच्या मृत्यूसाठी चीनला जबाबदार धरलं होतं. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. मी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावे, अशी चीनची इच्छा नाही. चीनला माझे विरोधक जो बिडेन यांना अध्यक्ष बनवायचे आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हा हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, "चीनने सातत्यानं चुकीची माहिती पसरवणे सुरूच ठेवले आहे, कारण जो बिडेन यांना अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. जेणेकरून चीन पुन्हा एकदा अमेरिकेचा फायदा उचलून अमेरिकेला उद्ध्वस्त करू शकेल. हे बर्‍याच काळापासून तो करत आला आहे. पण मी आल्यापासून तो असे करण्यात अपयशी ठरला असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीची रंगत आतापासूनच सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्पही कोरोना विषाणूच्या साथीसाठी चीनला जबाबदार धरत आहेत. याआधीही चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने लक्ष्य केले आहे, कोरोना विषाणूमुळे होणा-या मृत्यूसाठी चीनला जबाबदार धरले आहे. सध्या मी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलणार नसल्याचंही त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गरज पडल्यास चीनशी असलेले चीनशी असलेले संबंधही तोडू, अशी धमकीही दिली होती.  अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणा-या मृत्यूंची संख्या 95 हजारांवर पोहोचली आहे, तर १५ लाखांहून अधिक लोक इकडे या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. जून अखेरीस अमेरिकेत दोन लाख लोकांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागण्याची शक्यताही तज्ज्ञ वर्तवत आहेत..

हेही वाचा

एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...

CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन