शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

coronavirus : जगभरात डॉक्टर आपली मृत्यूपत्रं का करताहेत? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:45 IST

जगण्याची उमेद आहे, पण भविष्याचा ठाव नाही म्हणून.

ठळक मुद्देडॉक्टरही आता धास्तावले आहेत. कोरोनाचं रुप ते कुणाहीपेक्षा अधिक जवळून पाहत आहेत.

ज्याच्याकडे पाहून जगण्याची आस वाटावी असे डॉक्टरच जर जगण्यावरचा विश्वास हरवून बसले तर?या प्रश्नाचं उत्तर केवळ हतबलता नाही तर जगण्याची अनिश्चितता आणि त्यापायी केलेला व्यावहारिक इलाज असंही असू शकतं.म्हणूनच तर जगभर मात्र विशेषत: कॅनडा आणि अमेरिकेत डॉक्टर्स आपली मृत्यूपत्रं तातडीनं बनवून घेत आहेत. ज्यांनी आधी केलेली होती, ते त्यांचं नुतनीकरण करत आहेत.आपलं कर्ज, जबाबदा:या, संपत्ती यासंदर्भात निर्णय घेऊन त्यावर कायदेशीर उपाय करत आहेत.एकाएकी मृत्यूपत्र बनवून देण्याचं काम करणा:या कायदेविषयक तज्ज्ञांचं काम वाढलं आहे.हे केवळ या प्रगत देशातच नाही तर जपान, रशिया आणि युरोपातही काही देशांत डॉक्टरांनी तातडीनं आपली मृत्यूपत्रं करायला घेतली आहेत.त्याची कारणंही उघड आहे, आज देश कुठलाही असो आणि कितीही प्रगत असो, त्यांच्याकडे साधनांचा अभाव आहे. पीपीई, एन-95 मास्क डॉक्टरांना पुरेसे उपलब्ध नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.त्यातून डॉक्टरांना संसर्ग होवून डॉक्टर दगावण्याच्या घटनाही सर्रास घडत आहेत. डॉक्टर घरी न जाता आपल्या गाडीत, गॅरेजमध्ये व्हरांडयात झोपत आहेत.आपलं काहीही झालं तरी चालेल पण आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी काळजी घेताना त्यांच्या भवितव्याचाही विचारही डोकं शांत ठेवून करत आहेत.

कॅनडात तर डॉक्टरांच्या संघटनेनेच 43क्क्क् डॉक्टरांना संदेश पाठवून सुचवलं की, तुमची मृत्यूपत्रं तातडीनं करा, त्यांचं नुतनीकरण करा.कॅनडाच्या पंतप्रधानांना कोरोनानं गाठलं होतं, त्यामुळे तिथं पॅनिक मोठा आहे आणि डॉक्टरही आता धास्तावले आहेत.कोरोनाचं रुप ते कुणाहीपेक्षा अधिक जवळून पाहत आहेत.त्यामुळे त्यांनी आता ठरवलंय की, आता मृत्यूपत्रं करू. पुढचं पुढे!