coronavirus : जगभरात डॉक्टर आपली मृत्यूपत्रं का करताहेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:45 IST2020-04-13T17:44:18+5:302020-04-13T17:45:59+5:30
जगण्याची उमेद आहे, पण भविष्याचा ठाव नाही म्हणून.

coronavirus : जगभरात डॉक्टर आपली मृत्यूपत्रं का करताहेत?
ज्याच्याकडे पाहून जगण्याची आस वाटावी असे डॉक्टरच जर जगण्यावरचा विश्वास हरवून बसले तर?
या प्रश्नाचं उत्तर केवळ हतबलता नाही तर जगण्याची अनिश्चितता आणि त्यापायी केलेला व्यावहारिक इलाज असंही असू शकतं.
म्हणूनच तर जगभर मात्र विशेषत: कॅनडा आणि अमेरिकेत डॉक्टर्स आपली मृत्यूपत्रं तातडीनं बनवून घेत आहेत. ज्यांनी आधी केलेली होती, ते त्यांचं नुतनीकरण करत आहेत.
आपलं कर्ज, जबाबदा:या, संपत्ती यासंदर्भात निर्णय घेऊन त्यावर कायदेशीर उपाय करत आहेत.
एकाएकी मृत्यूपत्र बनवून देण्याचं काम करणा:या कायदेविषयक तज्ज्ञांचं काम वाढलं आहे.
हे केवळ या प्रगत देशातच नाही तर जपान, रशिया आणि युरोपातही काही देशांत डॉक्टरांनी तातडीनं आपली मृत्यूपत्रं करायला घेतली आहेत.
त्याची कारणंही उघड आहे, आज देश कुठलाही असो आणि कितीही प्रगत असो, त्यांच्याकडे साधनांचा अभाव आहे. पीपीई, एन-95 मास्क डॉक्टरांना पुरेसे उपलब्ध नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
त्यातून डॉक्टरांना संसर्ग होवून डॉक्टर दगावण्याच्या घटनाही सर्रास घडत आहेत. डॉक्टर घरी न जाता आपल्या गाडीत, गॅरेजमध्ये व्हरांडयात झोपत आहेत.
आपलं काहीही झालं तरी चालेल पण आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी काळजी घेताना त्यांच्या भवितव्याचाही विचारही डोकं शांत ठेवून करत आहेत.
कॅनडात तर डॉक्टरांच्या संघटनेनेच 43क्क्क् डॉक्टरांना संदेश पाठवून सुचवलं की, तुमची मृत्यूपत्रं तातडीनं करा, त्यांचं नुतनीकरण करा.
कॅनडाच्या पंतप्रधानांना कोरोनानं गाठलं होतं, त्यामुळे तिथं पॅनिक मोठा आहे आणि डॉक्टरही आता धास्तावले आहेत.
कोरोनाचं रुप ते कुणाहीपेक्षा अधिक जवळून पाहत आहेत.
त्यामुळे त्यांनी आता ठरवलंय की, आता मृत्यूपत्रं करू. पुढचं पुढे!