शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

CoronaVirus News: अनलॉक-1 मुळे होऊ शकते 1918 ची 'जीवघेणी' पुनरावृत्ती?; जाणून घ्या त्या मेसेजमध्ये तथ्य किती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 4:42 PM

लॉकडाऊन हटवल्यामुळे १९१८ मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा दावा

ठळक मुद्दे१९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूचा व्हायरल फेसबुक पोस्टमध्ये उल्लेखक्वारंटिन, सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध हटवल्यानं अनर्थ घडल्याचा उल्लेखइतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं फेसबुक पोस्टमधून आवाहन

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारत सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. बऱ्याचशा देशांनी लॉकडाऊन हटवल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा केला जात आहे. याचाच संदर्भ देत 'माणसानं १९१८ मध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये', अशी एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. हजारो जणांनी ती शेअर केली आहे. '१९१८ मध्ये जगात स्पॅनिश फ्लू नावाची महामारी आली होती. जवळपास दोन वर्षे स्पॅनिश फ्लूचा परिणाम पाहायला मिळाला. ५० कोटी लोकांना स्पॅनिश फ्लूची लागण झाली होती, तर ५ कोटी लोकांनी यामुळे जीव गमावला होता. यातील बहुतांश जणांचा बळी स्पॅनिश फ्लूच्या दुसऱ्या टप्प्यात गेला. त्यावेळी लोक क्वारंटिन आणि सोशल डिस्टन्सिंगला इतके कंटाळले होते की निर्बंध शिथिल होताच ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर आले. त्यानंतर काही आठवड्यांत स्पॅनिश फ्लूची पुन्हा लागण होऊ लागली. त्यात काही कोटी नागरिकांचा बळी गेला,' अशा आशयाची पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल झाली आहे.  

१९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूबद्दल करण्यात आलेला दावा अर्धसत्य आहे. १९१८-१९ दरम्यान जगात स्पॅनिश फ्लूची साथ आली होती. ५० कोटी लोकांना फ्लूची बाधा झाली. त्यातील ५ कोटी लोकांचा मृत्यू झाला, असं मानण्यात येतं. आधुनिक जगात आलेली ही सर्वात मोठी महामारी समजली जाते.स्पॅनिश फ्लूच्या दुसऱ्या टप्प्यात काही कोटी लोकांचा जीव गेला, यातही तथ्य आहे. सध्या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एक आलेख वापरण्यात आला आहे. त्यात दुसऱ्या टप्प्यात स्पॅनिश फ्लूनं सर्वाधिक बळी घेतल्याचं दिसत आहे. हा आलेख इंग्लंड आणि वेल्सशी संबंधित आहे. त्यात जागतिक आकडेवारीचा उल्लेख आहे. 
क्वारंटिन आणि सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध उठवल्यानं दुसऱ्या टप्प्यात स्पॅनिश फ्लूनं कोट्यवधींचे बळी घेतले हा दावा चुकीचा आहे. स्पॅनिश फ्लूचा सामना करताना जगभरातील देश आणि तिथल्या आरोग्य यंत्रणेनं उचलेली पावलं वेगवेगळी होती. काही ठिकाणी या काळातही परेड्स सुरू होत्या. तर अमेरिकेत याच काळात क्वारंटिनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन सुरू होतं. दुसऱ्या टप्प्यात स्पॅनिश फ्लू अधिक जीवघेणा ठरला, त्यामागे एक निश्चित असं कारण नाही. मात्र त्याचा संबंध सार्वजनिक आरोग्य धोरणांतील अपयशांशी होता. याशिवाय युद्धदेखील याला काही प्रमाणात जबाबदार होतं. या काळात पहिलं युद्ध महायुद्ध संपत आलं होतं. त्यामुळे युद्धासाठी गेलेले सैनिक मायदेशी परतत होते. त्यांचा प्रवास सुरू होता. स्पॅनिश फ्लूची साथ पसरली असताना १९१८ मध्ये फिलाडेल्फियामध्ये परेड झाल्याचा संदर्भ फेसबुक पोस्टमध्ये आहे. मात्र त्या परेडचं आयोजन क्वारंटिनचे निर्बंध हटवून करण्यात आलेलं नव्हतं.मुंबईकरांनो, दुकानं, ऑफिस, शाळा, कॉलेजसाठीची नवी नियमावली जाणून घ्यामुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या