CoronaVirus News: ...तर भारतासारख्या देशांवर अन्याय होणार; कोरोना लस उशिरा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:49 AM2020-06-19T03:49:02+5:302020-06-19T07:40:34+5:30

प्रतिबंधक लस : समन्यायी वाटप करण्याची मागणी

CoronaVirus developing countries might get corona vaccine late | CoronaVirus News: ...तर भारतासारख्या देशांवर अन्याय होणार; कोरोना लस उशिरा मिळणार

CoronaVirus News: ...तर भारतासारख्या देशांवर अन्याय होणार; कोरोना लस उशिरा मिळणार

Next

लंडन : कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी विकसित देशांमध्ये मोठी स्पर्धा लागली आहे. अशी लस शोधण्यात आली तर सर्वप्रथम आपल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळावा यासाठीही हे देश धडपडत आहेत. त्यामुळे ही साथ आटोक्यात येण्याच्या आधी तरी विकसनशील देशांना ही प्रतिबंधक लस मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस, रेड क्रिसेंट आणि अन्य महत्त्वाच्या संघटनांनी या महिन्याच्या प्रारंभी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘जगातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील प्रतिबंधक लस मिळणे हा त्याचा हक्क आहे. मात्र अशा निवेदनांची एकमताने अंमलबजावणी होणे हे तसे खूप कठीण असते.’ ही लस सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी कोणतेही धोरण जागतिक पातळीवर अद्याप आखण्यात आलेले नाही.

Web Title: CoronaVirus developing countries might get corona vaccine late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.