Coronavirus: ६३ हजार रुग्ण, ६ हजार मृत्यूंनंतर अखेर इटलीवासियांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:00 PM2020-03-24T16:00:36+5:302020-03-24T16:01:27+5:30

कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतर इटलीला सर्वाधिक फटका बसला आहे.

Coronavirus: The death toll of Coronavirus has dropped in Italy in the last three days mac | Coronavirus: ६३ हजार रुग्ण, ६ हजार मृत्यूंनंतर अखेर इटलीवासियांना मिळाला दिलासा

Coronavirus: ६३ हजार रुग्ण, ६ हजार मृत्यूंनंतर अखेर इटलीवासियांना मिळाला दिलासा

Next

जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीत 6 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर जगभरात कोरोनामुळे 16 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता हजारो लोकांचा जीव गमावल्यानंतर इटलीला गेल्या दोन- तीन दिवसांमध्ये दिलासा मिळाला आहे.

पीटीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इटलीमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसात कमी झाली आहे. इटलीत शनिवारी 793, रविवारी 651 आणि सोमवारी 601 मृत्यू नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृताचा आकडा कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे या आकडीवारीनूसार इटलीतील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळला आहे.

Coronavirus : ट्रम्प यांचा ‘सल्ला’ ऐकणे पडले महागात, चुकीचे औषध घेतल्याने एकाचा मृत्यू

इटलीतील एक वैद्यकीय अधिकारी याबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही कोरोनावर विजय मिळवला असं म्हणता येणार नाही. मात्र गेल्या दोन- तीन दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या कमी होत आहे, असं वैद्यकीय अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. 

Coronavirus: चीन कोरोनाबळींची खरी संख्या लपवतोय का?; 'हा' आकडा पाहून वाटतेय दाट शंका

जगभरात 3 लाख 81 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर तब्बल 16 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतर इटलीला सर्वाधिक फटका बसला असून कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे.  इटलीमध्ये आतापर्यंत 6077 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच याआधी इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जगातील ३५ देशांनी लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनेक देशांनी तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केली असून देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. संपर्क आणि संसर्गामुळे करोना होत असल्याने तो रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

Web Title: Coronavirus: The death toll of Coronavirus has dropped in Italy in the last three days mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.