शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

Coronavirus: कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’ धोकादायक पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:30 AM

कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य ज्यात सीडीसी आणि एफडीएचे प्रमुखही सहभागी आहेत. त्यांना स्वत:ला क्वारंटाईन करावं लागलं आहे.

ठळक मुद्देलवकरात लवकर उद्योगधंदे सुरु करावेत आणि अर्थव्यवस्था उभारावीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव लॉकडाऊन हटवल्यास अमेरिकेत मृतांचा आकडा १ लाखांच्या वर जाईल, तज्ज्ञांचा दावा

वॉश्गिंटन – अमेरिकेचे राष्ट्रपती भवन व्हाइट हाऊस सध्या कोरोना व्हायरसच्या जाळ्यात सापडलं आहे. याठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पैंस यांच्या नजीकच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसमध्ये कामाला जाण्यास भीती वाटत आहे असं राष्ट्राध्यक्षाच्या सहकाऱ्याने सांगितले आहे.

कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य ज्यात सीडीसी आणि एफडीएचे प्रमुखही सहभागी आहेत. त्यांना स्वत:ला क्वारंटाईन करावं लागलं आहे. हे लोक अशा व्यक्तीच्या संपर्कात आले ज्याच्यात कोरोनाचे लक्षण आढळले नाहीत तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तसेच मिलिटरी जनरलचे टॉपचे २ अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्याचसोबत सेनेट हेल्थ कमिटीचा एक कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. हा सर्व धोका असतानाही नेतृत्वाकडून लवकरात लवकर उद्योगधंदे सुरु करावेत आणि अर्थव्यवस्था उभारावी असा दबाव टाकण्यात येत आहे. यामुळे कोरोना संक्रमणात वाढ होऊ शकते. मात्र ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेत रविवारपर्यंत ८० हजार कोरोना रुग्ण दगावले आहेत. जगात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये दर तिसरा व्यक्ती अमेरिकेचा आहे. रविवारी प्रतिदिन होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आढळले. एक एप्रिलनंतर पहिल्यांदाच अमेरिकेत प्रतिदिन एक हजारांच्या खाली मृतांचा आकडा आला. मात्र अमेरिकेने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला तर ऑगस्टपर्यंत मृतांची संख्या वाढून १ लाख ३५ हजारपर्यंत पोहचू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनकडे पाहिलं तर वुहान शहरात ज्याठिकाणाहून कोरोनाचा फैलाव जगभरात झाला तेथे कोरोना रुग्ण सापडणे बंद झाल्यानंतर लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा वुहानमध्ये कोरोना महामारीचा परिणाम पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत अमेरिकेने अर्थव्यवस्था उभारणीसाठी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय केला तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी केविन हैजेट यांनी त्यांना कामाला जाण्याचीही भीती वाटते असं एका कार्यक्रमात म्हटलं आहे. इतकचं नाही तर नॅशनल गार्ड ब्यूरोचे चीफ जोसेफ लेंग्येल आणि नौदलाचे टॉप एडमिरल माइकल गिल्डाव यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाEconomyअर्थव्यवस्था