शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Coronavirus: या देशातून कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात, कोरोनाकाळातील सर्व निर्बंध हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:43 IST

CoronaVirus Positive News: भारतासह अन्य काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना दुसरीकडे जगातील काही देशांतून दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत.

तेल अविव - एकीकडे भारतासह अन्य काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना दुसरीकडे जगातील काही देशांतून दिलासादायक बातम्याही समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसलेल्या ब्रिटनमध्ये जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवसात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर दुसरीकडे इस्राइलमध्ये तब्बल ८० टक्के प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, त्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी साध्य करण्यात आली आहे. (Coronavirus completely removed from Israel, all restrictions on the Coronavir period removed, No deaths reported in Britain in one day)हर्ड इम्युनिटी गाठल्यामुळे इस्राइलमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले उर्वरित निर्बंधही हटवण्यात आले आहेत. आता येथील नागरिकांना रेस्टॉरंट्स, क्रीडास्पर्धा, सिनेमा हॉलमध्ये जाण्यासाठी लस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार नाही. तसेच संपूर्ण देशात लोकांना सभा, मेळावे घेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख २७ हजार ७८२ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत हा मोठा आकडा आहे. तसेच देशात आतापर्यंत कोरोनाचे ४४ लाख ९० हजार रुग्ण सापडले आहेत. तसेच येथे डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या आठवड्याच्या अखेरीस कमी असते. त्या दिवसांमध्ये अशा आकड्यांची नोंद घेतली जात नसल्याने असे घडते. दरम्यान ३० जुलैनंतर प्रथमच संपूर्ण ब्रिटनमध्ये एका दिवसात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. याबाबत आरोग्य सचिव मॅट हेनकॉक यांनी सांगितले की, खरोखरच ही चांगली बातमी आहे. याचा अर्थ गतवर्षी डिसेंबरपासून सुरू झालेल्या लसीकरणाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. मात्र तरीही लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. आम्ही आतापर्यंत कोरोनाला हरवलेलं नाही, असे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनामुळे ब्रिटनमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत होते.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIsraelइस्रायलEnglandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या