coronavirus : काळजीनं जगभर लोकांना पडू लागलीत  कोरोनाचीच स्वप्नं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:59 PM2020-04-17T13:59:49+5:302020-04-17T14:02:58+5:30

अलिकडेच ड्रिम रिसर्च इन्स्टिटय़ूट लंडन आणि हार्वर्ड विद्यापीठ,यांनी एक सर्वेक्षण केलं. त्याचं नाव होतं, ड्रिम सर्व्हे 

coronavirus: corona pandemic-is-giving-people-unusual-dreams | coronavirus : काळजीनं जगभर लोकांना पडू लागलीत  कोरोनाचीच स्वप्नं 

coronavirus : काळजीनं जगभर लोकांना पडू लागलीत  कोरोनाचीच स्वप्नं 

Next
ठळक मुद्देस्वप्नांची साखळीही मग कोरोनासारखी तुटत नाही.

तुम्हाला स्वप्नं  पडतात का?
खूप पडतात का? एरव्हीही पडतात की, आता कोरोना कोंडी झाल्यापासून आणि घरात बसल्यापासून जास्त पडतात.
तुम्ही घरातच आहात, कुणाला भेटत नाही, कुठं जात नाही, रात्री झोप उशीरा लागते, दिवसा खूप झोप येते, जड झाल्यासारखं वाटतं,
रात्री पडतात तशी दुपारीही स्वप्न पडतात असं होतंय का तुमचं?
तरी घाबरू नका, तुम्ही एकटेच काही अपवाद नाही.
जगभरात माणसांना या कोरोना कोंडीच्या काळात स्वप्नं  पडत आहेत, आणि काहींना त्या स्वप्नं ची भीती वाटते. काही स्वप्नंत खूप घाबरतात, काही दचकतात.
ही स्वपA खरी झाली तर काय असं वाटूनही घाम फुटतो. झोप मोड होते.
तर यासगळ्याचा अलिकडेच ड्रिम रिसर्च इन्स्टिटय़ूट लंडन आणि हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेश यांनी एक सर्वेक्षण केलं. त्याचं नाव होतं, ड्रिम सव्र्हे.
त्यात सर्वेक्षणात आढळून आलेल्या लक्षणांना त्यांनी नाव ठेवलं आहे, ‘ पॅनडेमिक ड्रिम्स’ अर्थात महामारीची स्वपA.
अनेकांनी ट्विट करुन आपल्या स्वप्नं चे अनुभव लिहिले आहेत.
आपल्याला काय आणि कशी स्वप्नं  पडतात हे सांगितलं आहे. अमूक आवडता माणूस, स्टार, आपला प्रेमाचा माणूस, कुणीतरी जिवाभावाची व्यक्ती आपल्याला घट्ट आलिंगन मारते आहे, आणि आपल्याला तिच्यामुळे किंवा तिला आपल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला अशी स्वप्नं  पडत असल्याचंही अनेकांनी नोंदवलं आहे.


ज्यांनी हा अभ्यास केला, त्याचे लेखक डायड्रे लाय बॅटेर सांगतात, ‘ जी लोक जास्त कल्पक असतात, जास्त विचार करतात त्या माणसांना एरव्हीही जास्त स्वप्नं पडतात. आता मात्र अनेक लोकांना जास्त प्रमाणात स्वप्नं  पडू लागली आहेत.  त्यातली अनेक स्वप्नं  कोरोना संसर्गाशी, त्याच्या भितीशी निगडीत आहेत.  एकीकडे एक गोष्ट बरी झाली आहे की, अनेक लोकांना पुरेशी झोपच मिळत नसे.फार कमी काळ लोक झोपत, अनेकांना झोपेची कमतरता हाच आजार होता. आता निदान सक्तीच्या लॉकडाउनमध्ये तरी लोक जरा जास्त झोपतील. मात्र झोपले तरी त्यांचं डोकं शांत होत नाही. त्यातून ्रअनेकांना स्वस्थ झोप लागत नाही, मनात भीती, स्ट्रेस आहे.
त्यातून ही भयकारी स्वप्नं  पडतात आणि आपल्याला हे स्वप्नं  का पडलं असा विचार अनेकजण मग दिवसभर करतात. स्वप्नांची साखळीही मग कोरोनासारखी तुटत नाही.

Web Title: coronavirus: corona pandemic-is-giving-people-unusual-dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.