CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:58 PM2020-03-28T13:58:10+5:302020-03-28T14:01:16+5:30

कोरोनाचं निदान करणाऱ्या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो.

CoronaVirus : Corona diagnosis will be done in just 5 minutes; Government approves kits vrd | CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी

CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी

Next

वॉशिंग्टन- कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. बऱ्याचदा कोरोना झालेली व्यक्ती लवकर समजत नाही. कारण त्या व्यक्तीमध्ये लक्षणं प्राथमिक टप्प्यात सामान्य सर्दी अन् खोकल्यासारखी असतात. कोरोनाचं निदान करणाऱ्या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची तपासणी करणारं किट्स आता अमेरिकेनं विकसित केलं आहे. गेल्या  काही दिवसांपूर्वी भारतातल्या पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)नंही याला मान्यता दिली आहे. 

आता अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारनंही या किट्सच्या वापराला परवानगी दिली आहे. किट्स फक्त ५ मिनिटांत रुग्णाला कोरोना झाला आहे की नाही, याचं निदान करणार आहे. अमेरिकेतली औषध निर्माता कंपनी एबोटनंही हे किट तयार केलं आहे. अमेरिकेतल्या रेग्युलेटर USFDAनेही त्याला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून या किट्सच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

नवीन किटला मान्यता- अ‍ॅबॉट कंपनीच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी वापरलेले नमुने  योग्य असल्याचे आढळले आहेत. यासाठी युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची परवानगी मिळाली असून, जलद, पोर्टेबल, पॉईंट-ऑफ-केअरची तपासणी केली जाणार आहे. 
आपल्याला अवघ्या ५ मिनिटांत कोरोना रुग्णाचं निदान करणं शक्य होणार आहे. अ‍ॅबॉटचा दावा आहे की, पॉझिटिव्ह केसची माहिती अवघ्या 5 मिनिटांत कळू शकणार आहे. त्याच वेळी संबंधित व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्यास समजण्यासाठी १३ मिनिटांचा वेळ लागणार आहे. 

न्यूज एजन्सी ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, अ‍ॅबॉटची नवीन टेस्ट किट गेमचेंजर ठरणार आहेत, कारण सध्या अमेरिका आणि युरोप सारख्या विकसित देशांमध्येही कोरोनाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा 24-48 सुरू ठेवून चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी खूप महाग आणि वेळ घेणारी आहे. प्रथम नमुने एकत्र केले जातात. मग प्रयोगशाळेत आरटी-पीसीआरद्वारे चाचणी केली जाते.

Web Title: CoronaVirus : Corona diagnosis will be done in just 5 minutes; Government approves kits vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.