CoronaVirus: 'सर्वात खराब मंदीचे कारण ठरू शकतो कोरोना'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:59 IST2020-04-19T02:15:08+5:302020-04-19T06:59:57+5:30
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांचे मत; मदत करणाऱ्या देशांचे केले कौतुक

CoronaVirus: 'सर्वात खराब मंदीचे कारण ठरू शकतो कोरोना'
संयुक्त राष्ट्रे : कोरोना हे अर्थव्यवस्थेतील सर्वात खराब मंदीचे कारण बनू शकते, असे मत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी दिला आहे. एंटोनियो गुटेरेस म्हणाले की, केवळ निम्न उत्पन्न असलेले देशच नव्हे, तर मोठ्या देशांनाही याचा फटका बसू शकतो. विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेत २०२० च्या अखेरपर्यंत सुधारणा होऊ शकते. तसेच साथीच्या आजारानंतर आर्थिक मंदीची सुरुवात होऊ शकते. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अन्य देशांची मदत करणाºया देशांचे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिया गुतारेस यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. भारताने अमेरिकेसह अनेक देशांना हायड्रोक्लोरोक्विनचा पुरवठा केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये १५०० पेक्षा अधिक रुग्णांवर या औषधांचे परीक्षण करण्यात येणार आहे.