शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

CoronaVirus जर्मनीने योग्य वेळी उपाय केल्याने नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:18 AM

सर्वाधिक आयसीयू बेड व्यवस्था : ‘सोशल डिस्टन्सिंग’ नियंत्रणाचे रहस्य

- अभय नरहर जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘कोविड १९’ म्हणजेच कोरोनाच्या साथीने जगभरात विशेषत: युरोपसह अमेरिकेत थैमान घातले आहे. मात्र, युरोपातील काही देशांना कोरोनाच्या संसर्गाची झळ बसूनही त्यांनी तातडीने पावले उचलत यावर उपाययोजना केल्या. त्यामुळे या देशात ही साथ पसरूनही त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणावर त्यांनी युरोपातील देशांच्या तुलनेने नियंत्रण मिळवले आहे. यात जर्मनी हे मोठे उदाहरण आहे. आजअखेर जर्मनीत एकूण ९६,१०८ विषाणू बाधित पेशंट असून, त्यापैकी एक हजार ४४६ मृत्युसंख्या आहे. यापैकी २६ हजार ४०० जण बरे झाले आहेत. याविषयी मूळच्या पुणेकर आणि जर्मनीत स्टुटगार्ट येथे स्थायिक झालेल्या अनघा महाजन यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.

महाजन यांनी सांगितले, की मागील वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये कोरोना व्हायरसची कुणकुण लागताच जर्मनीतील शास्त्रज्ञ जोरात कामाला लागले होते. अतिशय जलदगतीने व्हायरससाठी लागणारी चाचणी त्यांनी विकसित केली. जानेवारीच्या मध्यापासून ही टेस्ट जवळजवळ देशातील सर्व राज्यांतील लॅबपर्यंत पोहोचवण्यात आली होती. देशातील पहिला पेशंट कोरोनाबाधित होण्याआधीच येथे टेस्ट उपलब्ध होती. इटली, स्पेन व फ्रान्स या देशांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. जर्मनीने कोरोनामुळे होणाºया मृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय काम केले आहे. मास टेस्टिंग, सर्वाधिक आयसीयूमधील बेडची व्यवस्था आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ हेच नियंत्रणाचे रहस्य आहे. आज जर्मनीची आठवड्याला ५,००,००० (पाच लाख) टेस्ट करण्याची क्षमता आहे. तसेच या टेस्ट ‘युनिवर्सल मेडिकल इन्शुरन्स सिस्टिम’ने कव्हर केलेल्या आहेत. जर्मनीतील ‘रॉबर्ट कोख’ या रोगनियंत्रण संस्थेने सुचविल्याप्रमाणे तीन आठवड्यांपासून शाळा, रेस्टॉरंट बंद करण्याचा आणि दोनपेक्षा जास्त लोकांना बाहेर एकत्र फिरण्यास मनाई करण्याच्या कठोर उपायांनी व्हायरसचे नवीन संक्रमणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते.

इतर देशांच्या रुग्णांवरही उपचारजर्मन रुग्णालयांनी इटली व फ्रान्समधील काही गंभीर ‘कोविड १९’ रुग्णांना दाखल करून घेतले आहे. यामुळे जर्मन डॉक्टर, नर्सना गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर कसे उपचार करावेत, हे शिकण्याची संधी मिळणार आहे. इतर सर्व देशांनी त्यांच्या सीमा बंद केलेल्या असताना अशा पद्धतीने जर्मनीने आपल्या रुग्णालय व्यवस्थापन क्षमतेवर उल्लेखनीय आत्मविश्वास दाखवून दुसºया देशातील गंभीर रुग्णांना उपचार सेवा देण्याचा निर्णय घेतला. - अनघा महाजन, स्टुटगार्ट, जर्मनी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या