Coronavirus: China Betrayed Britain In War With Coronavirus Anti Body Test Become Useless pnm | Coronavirus: अरे हे चाललंय काय? पाकिस्तान, इटलीनंतर आता बोगस माल पाठवून चीनने ब्रिटनला लावला चुना

Coronavirus: अरे हे चाललंय काय? पाकिस्तान, इटलीनंतर आता बोगस माल पाठवून चीनने ब्रिटनला लावला चुना

ठळक मुद्देसध्या ब्रिटनचे पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाली आहे अविश्वसनीय चाचण्यांमुळे 'अत्यंत गंभीर परिणाम' होऊ शकतातचीनी अँटीबॉडी चाचणीमुळे लोकांना त्यांच्या प्रतिकारशक्तीबद्दल चुकीचे आशा मिळू शकते

लंडन – कोरोनाच्या संकटकाळातही पाकिस्तान, आयर्लंडनंतर आता ब्रिटनलाही चीनने गंडवलं आहे. यूके सरकारच्या नवीन चाचणी प्रमुखांनी कबूल केले आहे की चीनकडून खरेदी केलेल्या ३५ लाख अँटीबॉडी चाचण्या खराब निघाल्या आहेत. या अँटीबॉडी चाचण्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ शकत नाहीत. चीनच्या या फसवणुकीनंतर ब्रिटनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

एका वृत्तानुसार, चाचणीचे मुख्य प्राध्यापक जॉन न्यूटन यांनी असं म्हटले आहे की, या चीनी चाचण्या केवळ कोरोना व्हायरसने गंभीर आजारी असलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती ओळखण्यास सक्षम आहेत. या अँटीबॉडी चाचण्या सुरुवातीच्या टप्प्यात काही उपयोगाच्या नाहीत. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी होऊ शकत नाही असं ते म्हणाले. दरम्यान, या अविश्वसनीय चाचण्यांमुळे 'अत्यंत गंभीर परिणाम' होऊ शकतात कारण या चाचण्यांमुळे लोकांना त्यांच्या प्रतिकारशक्तीबद्दल चुकीचे आशा मिळू शकते असा यूके पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने असा इशारा दिला आहे.

चीनच्या अशा खराब अँटीबॉडी चाचण्यांमुळे ब्रिटनच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. सध्या ब्रिटनचे पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाली आहे त्यात त्यांची प्रकृती गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी इटलीने चीनला वैयक्तिक संरक्षित उपकरणे (पीपीई किट) दान केले होते. मात्र आता जेव्हा इटलीला पीपीईची नितांत गरज आहे, तेव्हा चीन दानमध्ये घेतलेले तीच उपकरणं इटलीला विकत आहे. द स्पॅक्टेटरच्या मते, या संकटाच्या काळात चीनने मानवतेचा मुखवटा घालून इटलीला पीपीई किट दान देणार असल्याचं जगाला दाखवून दिले. पण चीनचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कित्येक अहवालातून चीन पीपीई किट दान दिले नसून ते विकल्याचं सांगितलं आहे.

तर कोरोनापासून रक्षण करण्यासाठी एन-९५ मास्क पाठवण्याचं आश्वासन चीननं पाकिस्तानला दिलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीननं जरा जास्तच गुणगान गात होते. चीनने पाठवलेली मदत पाहून पाकिस्तानच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. चीननं अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाठवल्यानं रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे सिंध प्रांतातल्या सरकारनं कोणतीही तपासणी करता चीनकडून आलेली वैद्यकीय मदत थेट रुग्णालयांमध्ये पाठवून दिली. त्यामुळे चीनने आतापर्यंत या सगळ्यांना देशांना चूना लावण्याचं काम केले आहे.

Web Title: Coronavirus: China Betrayed Britain In War With Coronavirus Anti Body Test Become Useless pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.