CoronaVirus जिद्दीने लढले! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 01:14 IST2020-04-10T01:13:29+5:302020-04-10T01:14:21+5:30
जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती.

CoronaVirus जिद्दीने लढले! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूतून बाहेर
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालवल्याने मंगळवारी आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना आयसीयूतून बाहेर काढण्यात आले आहे.
जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. तसेच त्यांच्या वाग्दत्त वधूलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते तिथूनच देशाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खालवली होती. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
आज त्यांनी कोरोनाशी जिद्दीने लढा दिला असून प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना बाहेर आयसोलोशन वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. या बाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयानेच दिली आहे.
UK Prime Minister Boris Johnson (File pic) has been moved out of intensive care but remains in hospital: UK media pic.twitter.com/KCxWlD861V
— ANI (@ANI) April 9, 2020