शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 17:37 IST

"अमेरिका जगभरात समान विचार ठेवणाऱ्या भागिदारांसोबत काम सुरू ठेवत, चीनवर पूर्ण पारदर्शक तसेच पुराव्यांवर आधारीत आंतरराष्ट्रीय तपासात सामील होण्यासाठी आणि सर्व संबंधित माहिती तथा पुराव्यांपर्यंत पोहोचून, ते उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकतच राहणार."

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी आपल्या गुप्तचर संस्थांना, जगभरात विध्वंस निर्माण करणाऱ्या घातक कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध अधिक गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की 'आता मी, गुप्तचर संस्थांना माहिती एकत्रित करायला आणि तिचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न अधिक गतीमान करायला सांगितले आहे, जी आपल्याला निर्णायक निष्कर्षांच्या आणखी जवळ नेईल. तसेच त्यांना 90 दिवसांच्या आत रिपोर्ट करायलाही सांगितले आहे.'

बायडेन म्हणाले, त्यांनी रिपोर्टनुसार, आवश्यक तसेच तपासाची क्षेत्रे शोधायला सांगितले आहे. यात चीनसाठी विशेष प्रश्न असतील. ते म्हणाले, 'मी असेही सांगितले आहे, की या प्रयत्नांत आपल्या राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि सरकारच्या इतर संस्थांच्या कामांचाही समावेश व्हायला हवा. जेणेकरून गुप्तचर संस्थांच्या प्रयत्नांना अधिक गती मिळेल. याशिवाय, गुप्तचर संस्थांना वेळोवेळी त्याने केलेल्या कामाची काँग्रेसला माहिती देत रहावी,' असेही सांगितले आहे.

धक्कादायक! "पिढ्यानपिढ्या सोबतच राहणार कोरोना; नोव्हेंबरपर्यंत येणार तिसरी लाट", जीव्ही मूर्ती यांचा दावा

अमेरिकाचीनवर दबाव आणतच राहणार - बायडेनबायडेन यांनी म्हटले आहे, की अमेरिका जगभरात समान विचार ठेवणाऱ्या भागिदारांसोबत काम सुरू ठेवत, चीनवर पूर्ण पारदर्शक तसेच पुराव्यांवर आधारीत आंतरराष्ट्रीय तपासात सामील होण्यासाठी आणि सर्व संबंधित माहिती तथा पुराव्यांपर्यंत पोहोचून, ते उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकतच राहणार. तत्पूर्वी, 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हायरससंदर्भात माहिती मिळावी आणि अमेरिकेला याचा आणखी प्रभावीपणे सामना करता यावा, यासाठी बायडेन यांनी रोग नियंत्रण केंद्राला (सीडीसी) चीनपर्यंत पोहोच देण्यास सांगितले होते. 

धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

बायडेन म्हणाले, 'सुरुवातीच्या महिन्यांत आमच्या निरीक्षकांना  ग्राउंडवर जाऊ न देणे, कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील कुठल्याही प्रकारच्या तपासाला नेहमीच नुकसान पोहोचवेल. असे असतानाही, मार्च महिन्यात मी राष्ट्रपती होताच राष्ट्रीय संरक्षण सल्लागारांना, गुप्तचर संस्थांना करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या सर्वात अद्ययावत विश्लेषणाचा अहवाल तयार करायला सांगितले होते. यात संक्रमित पशूपासून, मानवी संपर्कापासून ते प्रयोगशाळेतील दुर्घटनेने झालेल्या उत्पत्तीपर्यंतच्या तपासाचा समावेश आहे.'

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन