शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 8:32 AM

जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत काल एका दिवसात 1321 जणांचा मृत्यू जगभरात काल एका दिवसात 5972 जणांचा मृत्यू जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर

न्यूयॉर्क - चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा फैलाव आता जवळपास जगभरातील सर्व देशांत झाला आहे. त्यातही युरोप आणि अमेरिकेत कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसात स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाने मृत्यूने थैमान घातले होते. तर आता अमेरिकेत कोरोनाची तीव्रता वाढली आहे. अमेरिकेत काल एका दिवसात 1321 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात काल एका दिवसात 5972 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव आता जगातील 200 हुन देशात झाला आहे. त्यातही आता अमेरिकेत कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 77 हजार 161च्या वर पोहोचली आहे. काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 32 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तर एका दिवसात 1321 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 7393 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

इतर देशांचा विचार केल्यास अमेरिकेपाठोपाठ काल फ्रान्समध्येही कोरोनाचा कहर दिसून आला. फ्रान्समध्ये काल एका दिवसात 1120 जणांचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6507 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. इटलीमध्ये काल एका दिवसात 766 जणांचा मृत्यू झाला. इटलीमधील मृतांचा आकडा 14,681 वर पोहोचला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 850 जणांचा मृत्यू झाला. स्पेनमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 19 हजार 199 हजारांवर पोहोचला आहे. इंग्लंड, जर्मनीमध्येही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढू लागला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 3605 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर जर्मनीत आतापर्यंत 1275 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर आशियाई देशात इराणमध्ये 3294 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयItalyइटली