Coronavirus : कोरोनाने युरोपलाही वेढले; 10000 लोकांना लागण होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 05:36 PM2020-03-13T17:36:37+5:302020-03-13T17:40:39+5:30

Coronavirus : युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 

CoronaVirus: 10,000 people in Britain fear of infection of Corona virus pda | Coronavirus : कोरोनाने युरोपलाही वेढले; 10000 लोकांना लागण होण्याची भीती

Coronavirus : कोरोनाने युरोपलाही वेढले; 10000 लोकांना लागण होण्याची भीती

Next
ठळक मुद्देदेशात कोरोनाचे एकूण ५९० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पण आतापर्यंत १० हजार नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.ब्रिटनमधील कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत या व्हायरसमुळे 189 लोकांचा मृत्यू झाला आहे.

लंडन - चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना जगातील इतर देशांमध्ये कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत जगभरात एकूण 1 लाख 34 हजार 803 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्रिटनमधील कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश सरकारने गुरुवारी तेथील 10,000 लोकांची कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली.

ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पैट्रिक वालेंस म्हणाले की, देशात कोरोनाचे एकूण ५९० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. पण आतापर्यंत १० हजार नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

लोकांना क्रूझवर न जाण्याचा सल्ला

पैट्रिक वालेंस यांनी डाऊनिंग स्ट्रीट येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, बरीच कुटुंबं आपला प्रियजणांना अकाली गमावू शकतात. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी खबरदारी म्हणून घेतल्या जाणाऱ्या उपायांची जलदगतीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत असतील त्यांनी स्वत: ला किमान सात दिवस घरातच राहावे. पैट्रिक वालेंसने शाळांना परदेश दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. या बरोबरच, खराब तब्येत असलेल्या लोकांना क्रूजवर न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोरोनाशी इतर देशांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी खबरदारीचा पावले उचलली नाहीत म्हणून ब्रिटन सरकारवर टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे ब्रिटनला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. इटलीसह अन्य देशांमध्ये संपूर्ण शहरे, शाळा आणि दुकाने बंद आहेत. युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 

कोरोनाची भीती झुगारून वेरूळ पाहण्यासाठी आले ६६ ब्रिटीश पर्यटक

Breaking: IPL 2020: कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली; BCCI ची घोषणा


इटलीमध्ये मृत्यूची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे

युरोपमधील बरेच देश कोरोनामुळे असुरक्षित आहेत. या देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेनचा समावेश आहे. इटलीमध्ये कोराना व्हायरस साथीच्या रोगाचे रूप धारण केले आहे. सरकारच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कोरोना या देशात नियंत्रणात नाही. इटलीमधील कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 1000 च्या वर गेला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत या व्हायरसमुळे 189 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये दोन आठवड्यांतच कोरोनामुळे मृतांचा आकडा 1016 झाला आहे.

Web Title: CoronaVirus: 10,000 people in Britain fear of infection of Corona virus pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.