कोरोनाच्या रिएन्ट्रीने चीन हादरला; आठ महिन्यांनी पहिला मृत्यू, दोन मोठे प्रांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 10:01 AM2021-01-14T10:01:12+5:302021-01-14T10:01:45+5:30

Corona Re-entry in China: जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची टीम चीनमध्ये काही वेळातच पोहोचणार असून चीनच्या वुहान विमानतळावर त्यांना नेण्यासाठी वाहने दाखल झाली आहेत. या टीममध्ये जागतिक ख्यातीचे 10 तज्ज्ञ असणार आहेत. 

Corona's reentry shook China; first death in eight months, two major province lockdowns | कोरोनाच्या रिएन्ट्रीने चीन हादरला; आठ महिन्यांनी पहिला मृत्यू, दोन मोठे प्रांत लॉकडाऊन

कोरोनाच्या रिएन्ट्रीने चीन हादरला; आठ महिन्यांनी पहिला मृत्यू, दोन मोठे प्रांत लॉकडाऊन

Next

कोरोना महामारीन अवघ्या जगाला महासंकटात टाकणाऱ्या चीनला पुन्हा हादरा बसला आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एन्ट्री केली असून आठ महिन्यांनी पहिल्यांदाच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे चीनच्या मोठ्या प्रांतामध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. 


चीनमध्ये कोरोनाचा शेवटचा बळी मे 2020 मध्ये गेला होता. त्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याएवढे रुग्ण सापडत होते. परंतू कोणाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, चीनच्या हैबेई प्रांतात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे 20 दशलक्ष लोकसंख्येच्या या भागात आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच कडक लॉकडाऊन लावला आहे. या प्रांतात 8 महिन्यांनी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय़ आरोग्य विभागाने सांगितले की येथे 138 नवीन रुग्ण सापडले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या मार्चनंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. 


दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची टीम चीनमध्ये काही वेळातच पोहोचणार असून चीनच्या वुहान विमानतळावर त्यांना नेण्यासाठी वाहने दाखल झाली आहेत. या टीममध्ये जागतिक ख्यातीचे 10 तज्ज्ञ असणार आहेत. 




कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून चीन सरकारने हैबेई प्रांतातील राजधानी शीज़ीयाज़ूआंगमध्ये परिवाहन बस, ट्रेन, शाळा, दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्याच्या शेजारील प्रांत जिंगताईमध्येही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या प्रांतातील लैंगलांग शहरात पाच दशलक्ष लोक राहतात. जे गेल्या शुक्रवारपासून घरात बंद आहेत. 

चीनची लस सपशेल फेल

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीनने तयार केलेल्या सायनो व्हॅक लशीच्या नुकत्याच आलेल्या परीक्षणाच्या निकालाने संपूर्ण ब्राझीलला भयभीत केले आहे. चीनने मोठ्या आशेने ही लस पाठवली होती. मात्र, ती कोरोनाविरोधात केवळ 50 टक्केच यशस्वी ठरली. चिनी लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाच्या या निकालानंतर ब्राझील सरकारने भारतीय लशीकडे आपले लक्ष वळवले आहे. याचाच एक भाग म्हणून ब्राझीलने मंगळवारी कोव्हॅक्सीन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कम्पनीसोबत करार केला आहे. याशिवाय ऑक्सफर्ड-एस्ट्रजेनकाच्या लशीसाठीही पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटसोबत करार केला आहे. 

भारत बायोटेकचे वरिष्ठ अधिकारी मुरली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की ब्राझील सरकारच्या हेल्थ रेग्युलेटर अन्विसाने थेट कंपनीकडून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला थेट लशीचा सप्लाय करण्याबरोबरच कंपनीने ब्राझीलमधील प्रेसिसा मेडिकामेंटोस कम्पनीसोबतही 12 जानेवारीला करार केला आहे. ब्राझील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, खासगी कम्पनीच्या मार्गाने होणाऱ्या खरेदीला स्वतंत्र्यपणे मंजुरी दिली जाईल. सध्या येणाऱ्या काळात ब्राझीलला जवळपास 1.2 कोटी डोस पुरवणे हे भारत बायोटेकचे लक्ष्य आहे.

Web Title: Corona's reentry shook China; first death in eight months, two major province lockdowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.