शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

Corona Virus: कोरोना विषाणूचा जगभर हाहाकार सुरूच!; रुग्णांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:37 IST

प्रवाशांना अमेरिकेत येण्यास महिनाभर बंदी, देशातील क्रीडा स्पर्धा व जत्रांवर गंडांतर

जिनिव्हा : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या १ लाख २४ हजारवर पोहोचली असून, या साथीमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ४,५५० झाली आहे. ही साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्यानंतर युरोपमधील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास पुढील महिनाभर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. मात्र या बंदीतून ब्रिटनला वगळण्यात आले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतलेल्या ब्राझिलच्या अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेमध्ये १३०० लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे ३७ जण मरण पावले आहेत. युरोपातील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुढील महिनाभर बंदी घातली आहे. साथ रोखण्यासाठी युरोपमधील देशांनी पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. चीन, दक्षिण कोरियामधील स्थितीवरही अमेरिका लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले. जगभरात १०७ देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. त्या देशातील बळींची संख्या आता ३,१६९वर पोहोचली आहे. ही माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली. चीनमधील रहिवाशांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असली तरी आता विदेशातून चीनमध्ये परतणाºया नागरिकांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ वरराज्यात गुरुवारी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण पुणे येथील असून हा ३३ वर्षीय पुरुष अमेरिकेला जाऊन आला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण, तसेच हिंदुजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षांचा पुरुष रुग्ण गुरुवारी तपासणीत कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.अभिनेता टॉम हँक्स व त्याची पत्नी रिटाला कोरोनाचा संसर्गहॉलिवूडचा सुपरस्टार टॉम हँक्स व त्याची पत्नी रिटा विल्सन या दोघांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हे दांपत्य सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होते. काम करताना थकवा जाणवू लागल्याने त्या दोघांनीही वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट झाले.शेकहॅण्डऐवजी नमस्ते!कोरोनामुळे परस्परांच्या स्वागताचा हा पाश्चात्त्य रिवाज मागे पडून आता जगात अनेक ठिकाणी भारतीय पद्धतीने ‘नमस्ते’चा अंगीकार होत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मर्कॉन यांनी यापुढे समपदस्थांचे ‘नमस्ते’ने स्वागत करण्याचे जाहीर केले. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स वेस्टमिनस्टर अ‍ॅबे येथे आले तेव्हा उपस्थितांशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे केलेला हात चटकन मागे घेत त्यांनी ‘नमस्ते’ केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत चर्चेचा विषय ठरला.शेअर बाजारात सर्वात मोठी घसरणगुंतवणूकदारांची 11.27 लाख कोटींची संपत्ती पाण्यातकोरोनाची भीती, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली जागतिक साथ, अमेरिकेने युरोपियन देशांमधून येणाऱ्यांवर लादलेली बंदी, बाजारात सातत्यपूर्ण मोठी विक्री यांच्या परिणामामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणी दिसून आली. भारतामधील शेअर बाजारातही गुरुवारी मोठी घसरण झालेली बघावयास मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदविली. निफ्टीने तिहासातील सर्वाधिक घसरणीची नोंद केली आहे. गुंतवणूकदारांची एका दिवसात ११.२७ लाख कोटींची मालमत्ता वाहून गेली. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात २९१९.२६ अंश म्हणजेच ८.१८ टक्के घट झाली आहे.

आयपीएलही प्रेक्षकांविना?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत व दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने रिकाम्या स्टेडियवर होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने गुरुवारी ही घोषणा केली. परंतु आयपीएल आयोजनाविषयी बीसीसीआयने अद्याप मौन पाळले आहे. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदा आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांविना करण्याचे संकेत दिले आहेत. आयपीएल संचालन परिषदेच्या शनिवारी होणाºया बैठकीत याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना