शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

Corona Virus: कोरोनाच्या दहशतीमुळे ब्रिटनच्या राणीने सोडला राजमहाल; 'या' ठिकाणी करणार वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:35 IST

'द सन' या दैनिकाच्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही. मात्र कोणतीही  जोखीम घ्यायची नाही.

ठळक मुद्देराणीला विंडसरमध्ये नेण्यात आले आहे. त्यांची तब्येत बरी आहेविंडसरमध्ये 100 आणि सैंड्रिगममध्ये 12 जणांचा स्टाफ आहे. मे आणि जूनमध्ये आयोजित पॅलेसच्या पार्ट्या रद्द

लंडन - जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका ब्रिटनच्या राणीलाही बसला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात ६ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. चीनपाठोपाठ इटलीमध्ये या व्हायरसने सर्वाधिक बळी घेतले आहेत. 

ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनाही कोरोनाच्या भीतीमुळे बर्मिंघॅम पॅलेस सोडून विंडसर कॅसलमध्ये नेण्यात आलं आहे. जर देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला तर त्यांना आणि प्रिन्स फिलिपला सैंड्रिगममध्ये वेगळं ठेवण्यात येईल अशी त्यांची योजना आहे. राजघराण्यातील एका सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, राणीला विंडसरमध्ये नेण्यात आले आहे. त्यांची तब्येत बरी आहे, पण त्यांना तेथून हलवणे चांगले आहे. राणीच्या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची दहशत आहे. 

रिपोर्टनुसार, पॅलेसमध्ये जगभरातील नेत्यांचे येणंजाणं होत असतं. नुकतीच राणीने बर्‍याच लोकांना भेट दिली होती. महाराणीचा 94 वा वाढदिवस काही दिवसांवर आला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांची जागा बदलण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. बर्मिंघॅम पॅलेस एक धोकादायक जागा असू शकेल' लंडनच्या मध्यभागी असलेले आणि इतर ठिकाणांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत असं सूत्रांनी सांगितले आहे. 

'द सन' या दैनिकाच्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही. मात्र कोणतीही  जोखीम घ्यायची नाही. बर्मिंघम पॅलेसमध्ये सुमारे 500 लोक आहेत, विंडसरमध्ये 100 आणि सैंड्रिगममध्ये 12 जणांचा स्टाफ आहे. मे आणि जूनमध्ये आयोजित पॅलेसच्या पार्ट्या रद्द किंवा पुढे ढकलल्याच्या मार्गावर आहेत, ज्यामध्ये 30,000 अतिथी भाग घेऊ शकतील. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 हजार 140 लोकांना कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे. त्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. 

युरोपमध्ये कोरोना व्हायरसमुळे 2000 हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. इटलीमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू 368 झाले. त्याचबरोबर स्पेनमध्येही हा आजार वाढत आहेत. स्पेनमधील 100 हून अधिक लोक या आजाराने बळी पडले. जगातील दीड लाखाहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना