Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 17:33 IST2021-12-14T17:32:56+5:302021-12-14T17:33:38+5:30
ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटनशिवाय कुणीही हे जाहीरपणे मान्य केलेले नाही.

Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!
UK मध्ये Omicron व्हेरिअंटच्या संसर्गाने पहिला बळी घेतला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा जगात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण 27 नोव्हेंबरला समोर आला होता. तेव्हापासून तेथे अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. याच बरोबर, कोरोनाचा हा नवा व्हेरिअंट लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही संक्रमित करू शकतो, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः लोकांना दिला आहे.
ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटनशिवाय कुणीही हे जाहीरपणे मान्य केलेले नाही.
ओमायक्रॉनवर इशारा -
लंडनमधील लसीकरण केंद्रात पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, 'ओमाक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद गोष्ट म्हणजे. यामुळे हा व्हायरसचा किरकोळ प्रकार आहे, ही कल्पना आपण बाजूला ठेवायला हवी. लोकांमध्ये पसरण्याचा वेग आपण लक्षात घ्यायला हवा.
आरोग्य सचिव साजिद जाविद यांनीही या व्हेरिअंटसंदर्भात लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'लंडनमध्ये 44% लोकांना या व्हेरिअंटची लागण झाली आहे आणि 48 तासांत तो राजधानीत पूर्णपणे पसरेल'. एवढेच नाही, तर रोज ओमायक्रॉनचे सुमारे 200,000 नवे रुग्ण समोर येऊ शकतात, असा अंदाजही जाविद यांनी व्यक्त केला आहे.