शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Corona Virus: कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 06:28 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपुरता मर्यादित नसून, जगातील सुमारे ३0 देशांतील १५0 लोकांना त्याची लागण झाली आहे.

बीजिंग : कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपुरता मर्यादित नसून, जगातील सुमारे ३0 देशांतील १५0 लोकांना त्याची लागण झाली आहे. हाँगकाँग व फिलिपिन्समध्ये या विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे. चीनमध्येकोरोनाच्या संसर्गामुळे ४२५ लोक मृत्युमुखी पडले असून, २0 हजार ४00 जणांना त्याची लागण झाली आहे.

सिंगापूर (२४), जपान (२0), थायलंड (१९), हाँगकाँग (१७), दक्षिण कोरिया (१६), ऑस्ट्रेलिया (१२), मलेशिया (१0), तैवान(१९), व्हिएटनाम (१0), मकाऊ (९), भारत (३), फिलिपिन्स (२), नेपाळ (१), श्रीलंका (१) व कम्बोडिया (१) या देशांखेरीज अमेरिका (११), ब्रिटन (२), कॅनडा (४), जर्मनी (१२), इटली (२), रशिया (२), फिनलंड (१), स्पेन (१), बेल्जियम (१), स्वीडन (१), पाकिस्तान (१) आणि सौदी अरेबिया (५) या देशांत कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला ठरवून दिलेल्या वेळेत दिवसातून एकदाच बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. चीनमार्गे समुद्रमार्गे आलेल्या ३७00 लोकांना जपानमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. तेथून परवानगीशिवाय त्यांना बाहेर पडता येणार नाही.

एअर इंडियाची सेवा बंद

एअर इंडियाने चीनमधील शहरांत जाणारी विमाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची विमाने ७ फेब्रुवारी ते ३१ मार्च या काळात चीनला जाणार नाहीत. दुसरीकडे चीनचे नागरिक तसेच चीनचा पासपोर्ट बाळगणारे अन्य देशांचे नागरिक यांना भारतात प्रवेश करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतchinaचीनMumbaiमुंबईAir Indiaएअर इंडिया