शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus: ...तर सहा फुटांचे अंतरही सुरक्षित नाही; कोरोना हवेतून पसरतो, अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 11:07 AM

Corona Virus is spreading by Air, new Guideline from American CDC: सीडीसीने काही परिस्थितीमध्ये सहा फुटांचे अंतरही सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. सीडीसीने अमेरिकेमध्ये नागरिकांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे.

कोरोना (CoronaVirus) हवेतून पसरतो (Airborne) की नाही यावर मतमतांतरे असली तरीदेखील अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन (सीडीसी) (US Centers for Disease Control and Prevention (CDC) ) ने यावर मोठा खुलासा केला आहे. कोरोना हा हवेतून एकाकडून दुसऱ्याला संक्रमित करू शकतो. श्वास सोडताना नाकावाटे किंवा तोंडावाटे निघणाऱ्या अतिसूक्ष्म कणांद्वारे तो हवेतून पसरण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. (corona virus is airborne and can be transmitted through very fine aerosolised particles released during respiration.)

सीडीसीने अमेरिकेमध्ये नागरिकांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाचा SARS-CoV-2 हा व्हायरस श्वासावाटे निघणाऱ्या द्रव्य कणांद्वारे पसरतो. अनेकदा बोलताना लोकांच्या तोंडातून थुंकीचे थेंब किंवा छोटे छोटे कण बाहेर पडतात. हे कण आजुबाजुच्या जागेवर पडतात किंवा हवेमध्ये तरंगत राहतात. मोठे थेंब असतील तर ते काही सेकंदांत किंवा काही मिनिटांत जमिनीवर अथवा अन्य पृष्ठभागावर पडतात. मात्र, खूप छोटे कण (एअरोसोल) असतात ते काही मिनिटे ते काही तास हवेतच राहतात, असे म्हटले आहे. 

...तर सहा फुटांचे अंतरही सुरक्षित नाहीसीडीसीने काही परिस्थितीमध्ये सहा फुटांचे अंतरही सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. जर कोरोनाबाधित रुग्ण 15 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखाद्या घरात किंवा खोलीत असेल तर त्याच्या श्वासातून बाहेर पडलेला कोरोना व्हायरस हवेतच राहतो आणि अशा परिस्थितीत सहा फुटांपेक्षा जास्त अंतर असलेल्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा होऊ शकते. अन्य खुल्या जागांवर सहा फुटांचे अंतर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

लॅन्सेट जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण महिनाभराने सीडीसीच्या या नवीन गाईडलाईन आल्या आहेत. लॅन्सेटमध्ये कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे म्हटले होते. कोरोना हवेतून पसरत असल्याचे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या सहा शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे तर हा आजार हवेतून पसरत नसल्याचे 100 शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

कोरोना हवेतून पसरत असेल तर काय करावे लागेल?कोरोना हवेतून पसरत असल्यास प्रतिबंधात्मक नियमांमध्ये बदल करावे लागतील. आपल्याला चांगल्या मास्कची गरज भासेल. शारीरिक अंतर वाढवावे लागेल. निर्जंतुकीकरण योग्य पद्धतीने करावे लागेल. कोरोना हवेतून पसरत नसल्याचा ठोस पुरावा नाही. हा आजार सध्या वेगात पसरत आहे. वैज्ञानिकांनी मानव व जनावरांवर विविध प्रयोग केले आहेत. हा विषाणू हवेत तीन तास थांबतो. त्यामुळे हवेतून कोरोना संक्रमण होऊ शकते, असे नागपूरच्या डॉ. अशोक अरबट यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका