Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात फायजर अन् कोविशील्ड लस कमी प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:48 PM2021-08-19T18:48:47+5:302021-08-19T18:58:56+5:30

१७ मे २०२१ ते १ ऑगस्ट २०२१ दरम्यान ३ लाख ५८ हजार ९८३ स्वयंसेवकांकडून घेतलेले ८ लाख ११ हजार ६२४ चाचणी नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले.

Corona Vaccine: Pfizer and AstraZeneca are less effective against Delta variants of Corona | Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात फायजर अन् कोविशील्ड लस कमी प्रभावी

Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात फायजर अन् कोविशील्ड लस कमी प्रभावी

Next

फायजर आणि एस्ट्राजेनेका कोविड १९ लसी कोरोना व्हायरसच्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध (Delta Variants) कमी प्रभावी आहेत. असा दावा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या तज्त्रांनी एका रिपोर्टमध्ये केला आहे. परंतु संशोधनानुसार, फायजर बायोएनटेक आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लसी जी कोविशील्ड नावानं ओळखली जाते. डेल्टा व्हेरिएंटसह अन्य संक्रमणाविरुद्ध चांगली सुरक्षा उपलब्ध करू शकते असंही संशोधक म्हणत आहेत.

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी म्हटलं आहे की, फायजर(Pfizer) किंवा एस्ट्राजेनेका-कोविशील्ड (Astrazeneca-Covishiled) या दोन्ही लसींचे दोन्ही डोस आजही चांगल्या दर्जाची सुरक्षा देते जशी नैसर्गिक संक्रमणानंतर कोविड १९ रुग्णांमध्ये तयार होते. संशोधकांनी १ डिसेंबर २०२० ते १६ मे २०२१ पर्यंत १८ वर्ष आणि त्यावरील वयाच्या ३ लाख ८४ हजार ५४३ लोकांच्या नाक आणि गळ्यातून घेतलेल्या २५ लाख ८० हजार नमुन्यांचे विश्लेषण केले आहे.

तसेच १७ मे २०२१ ते १ ऑगस्ट २०२१ दरम्यान ३ लाख ५८ हजार ९८३ स्वयंसेवकांकडून घेतलेले ८ लाख ११ हजार ६२४ चाचणी नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. या रिपोर्टमध्ये असं निदर्शनास आलं की, ज्या लोकांचं कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर लसीकरण झालं आहे. त्या लोकांना ज्यांनी लसीकरण केले आहे परंतु यापूर्वी कोविड १९ संक्रमण झालं नाही अशा लोकांच्या तुलनेत चांगली सुरक्षा मिळत आहे. परंतु रिपोर्टनुसार लसीकरणानंतर दोन्ही डोस घेतले तरीही डेल्टा व्हायरसचा संक्रमण ज्यांनी लस घेतली नाही त्याप्रमाणेच असल्याचं दिसून आलं आहे.

यापूर्वीही झाला आहे रिसर्च

अलीकडेच झालेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की, फायजर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये एस्ट्राजेनेका लस घेतलेल्यांच्या तुलनेत काही जास्त प्रमाणात अँन्टिबॉडी तयार झाली आहे. एस्ट्राजेनेका लस भारतात कोविशील्ड नावानं ओळखली जाते. लस घेतलेल्यांमध्ये अँन्टिबॉडी कोरोना संक्रमित झालेल्यांपेक्षा अधिक आढळली आहे. तर आणखी एका स्टडीत फायजर लस मूळ व्हेरिएंटच्या तुलनेत भारतीय डेल्टा व्हेरिएंटविरोधात ५ पटीनं कमी अँन्टिबॉडीज निर्माण करते असं सांगितले आहे.

जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात आतापर्यंत ५५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटनं सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे.  यातच काही देशांमध्ये बुस्टर डोस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे.

Web Title: Corona Vaccine: Pfizer and AstraZeneca are less effective against Delta variants of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.