Corona Vaccination: कोरोनाच्या लसीपासून वाचवण्यासाठी आईने केलं स्वत:च्याच मुलांचं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:09 IST2022-01-06T17:09:06+5:302022-01-06T17:09:47+5:30
Corona Vaccination: स्पेनमध्ये एका महिलेवर तिच्या दोन मुलांचे लसीपासून वाचवण्यासाठी अपहरण केल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप महिलेच्या माजी पतीने केला आहे.

Corona Vaccination: कोरोनाच्या लसीपासून वाचवण्यासाठी आईने केलं स्वत:च्याच मुलांचं अपहरण
माद्रिद - स्पेनमध्ये एका महिलेवर तिच्या दोन मुलांचे लसीपासून वाचवण्यासाठी अपहरण केल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप महिलेच्या माजी पतीने केला आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला स्वत:च अधिकाऱ्यांसमोर हजर झाली. दरम्यान जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनमुळे दहशतीचे वातावरण आहे. तसेच स्थानिक सरकारांकडून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी योजना आखण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांमधून समोर येत असलेल्या रिपोर्टनुसार ४६ वर्षांची महिला अल्पवयीनांचे अपहरण केल्याप्रकरणी वाँटेड होती. महिलेच्या पतीने डिसेंबरच्या मध्यावर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यामध्ये त्यांनी या महिलेवर १४ आणि १२ वर्षांच्या दोन मुलांचे विनाअधिकार अपहरण केल्याचा आरोप केला होता. त्याने त्याच्या मुलांना ४ नोव्हेंबरपासून पाहिलेले नाही, असा दावाही त्याने केला.
त्याने सांगितले की, त्याला माजी पत्नीपासून एक मुलगा आहे. ती त्याला शाळेतून काढण्याची योजना आखत होती. काही दिवसांपूर्वी कोर्टाने या व्यक्तीकडे मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, ही महिला बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांसमोर मुलांसह हजर झाली. दरम्यान, न्यायाधीशांनी तिला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.