कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जाऊ लागला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्याकडच्या लहानग्यांचे लसीकरण कसे केले जाईल, याचा आराखडा बांधण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका खंडचिली : १२ ते १६ वयोगटातील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास ३१ मे रोजी चिली सरकारने मंजुरी दिलीअमेरिका : अमेरिकेत १२ ते १५ वयोगटातील मुलांचे मे महिन्याच्या मध्यापासून लसीकरण सुरू झाले.कॅनडा : १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्याची मंजुरी कॅनडा सरकारने मे महिन्यात दिली आहेयुरोपीय देशब्रिटन : फायझरने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची परवानगी ब्रिटिश सरकारकडे मागितली आहेनॉर्वे : कोरोनाचा गंभीर धोका असलेल्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यायचे नॉर्वे सरकारचे उद्दिष्ट आहेस्वित्झर्लंड : १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझरला मे महिन्यात परवानगी दिली आहेयुरोपीय संघातील देशइटली : १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास सरकारने मंजुरी दिली आहेजर्मनी : १२ ते १६ वयोगटातील मुलांना ७ जूनपासून लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. पोलंडमध्येही याच दिवसापासून मुलांचे लसीकरण केले जाणार आहेलिथुआनिया : या महिन्यापासून १२ वर्षे वयावरील मुलांचे लसीकरण केले जाईल, असे लिथुआनियाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहेफ्रान्स : या महिन्याच्या मध्यापासून फ्रान्समध्ये १६ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. तर शाळा सुरू होईल तेव्हापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे इस्टोनिया : हिवाळ्यात सर्व मुलांचे लसीकरण केले जाणार आहेरोमानिया : १ जूनपासून १२ वर्षे वयावरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झालीऑस्ट्रिया : ऑगस्ट अखेरपर्यंत १२ ते १५ वयोगटातील ३.४० लाख मुलांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहेहंगेरी : १६ ते १८ वयोगटातील मुलांचे मे महिन्याच्या मध्यापासून लसीकरण सुरू झाले.मध्य पूर्वेकडील देशइस्रायल : जानेवारी महिन्यातच इस्रायलने १६ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ केला. आता १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहेदुबई : १ जूनपासून १२ ते १५ वयोगटाील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास सुरुवात झाली आहेआशिया-प्रशांत महासागरसिंगापूर : १ जूनपासून १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली जपान : १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यास सरकारने २८ मे रोजी मंजुरी दिलीफिलिपाइन्स : २६ मे रोजी फिलिपाइन्स सरकारने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली
Corona Vaccination: या देशांमध्ये होणार मुलांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:27 IST