CoronaVirus News: दिलासादायक! अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सेविकेला दिली लस
By मुकेश चव्हाण | Updated: December 14, 2020 22:10 IST2020-12-14T22:10:17+5:302020-12-14T22:10:24+5:30
फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे.

CoronaVirus News: दिलासादायक! अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सेविकेला दिली लस
नवी दिल्ली: अमेरिकेत कोरोना संसर्गाच्या थैमानादरम्यान प्रतिबंधक लसीचा पहिला डोस सोमवारी देण्यात आला. कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या अमेरिकेत फायजरच्या लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. याबाबात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं अभिनंदन करताना ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
"First vaccine administered in the US", tweets President Donald Trump. #COVID19pic.twitter.com/EG11uZJo7s
— ANI (@ANI) December 14, 2020
मिळालेल्या माहितीनूसार, अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली आहे. फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे.
दरम्यान, भारतातही Pfizer-BioNtech या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की, या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी २०२१ पासून भारतात कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे.