Corona, not just Antarctica in the world, is home to thousands of scientists | जगात अंटार्क्टिकावरच नाही कोरोना, हजार शास्त्रज्ञ वास्तव्याला

जगात अंटार्क्टिकावरच नाही कोरोना, हजार शास्त्रज्ञ वास्तव्याला

जोहान्सबर्ग : सारे जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना फक्त एका भूभागावर या संसर्गाचे अजिबात अस्तित्व आढळून येत नाही. तो प्रदेश आहे अंटार्क्टिकाचा. तिथे मास्क न वापरता तसेच कोरोनाचे दडपण न घेता मोकळेपणाने भटकता येते.
सध्या अंटार्क्टिकावर सुमारे १ हजार शास्त्रज्ञ व त्यांचे मदतनीस राहत आहेत. हिवाळ्याच्या मोसमात शास्त्रज्ञांची नवी तुकडी ज्यावेळी अंटार्क्टिकावर येईल त्यावेळी त्यांच्या समवेत कोरोना साथीने या प्रदेशात प्रवेश करू नये अशीच सर्वांची इच्छा आहे. अंटार्क्टिकावर ब्रिटनचे रोथेरा रिसर्च सेंटर आहे. तेथील शास्त्रज्ञ रॉब टेलर यांनी सांगितले की, कोरोनापासून आम्ही सर्व जण या प्रदेशात सुरक्षित आहोत. कोरोना साथ येण्याच्या आधी अंटार्क्टिकावरील शास्त्रज्ञांच्या आयुष्याबद्दल सर्वांनाच काहीसे वाईट वाटत असे. कारण या प्रदेशाचा जगाशी फारसा संपर्क येत नसल्याने अंटार्क्टिकावर राहणारा माणूस काहीसा एकटा पडतो. जणू विलगीकरणात अनेक दिवस राहावे लागते तशी येथील माणसांची अवस्था असते. रॉब टेलर म्हणाले की, कोरोना काळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर ब्रिटनमधील नागरिकांना जितके कमी स्वातंत्र्य उपभोगायला मिळत होते, त्यापेक्षा कितीतरी मनमोकळेपणाने आम्ही अंटार्क्टिकामध्ये वावरत आहोत.

आयुष्यातील रंगत ठेवली कायम
न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने अंटार्क्टिकावरील संशोधनानंतरच्या फुरसतीच्या वेळात विविध प्रकारे खेळ खेळून आयुष्यातील रंगत कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. अंटार्क्टिकावरील अतिशय थंड वातावरण हे ४० वर्षांवरील व्यक्तींच्या आरोग्यासाठी फारसे चांगले नसते, असे म्हटले जाते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona, not just Antarctica in the world, is home to thousands of scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.