शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जगभर कोरोनाचा हाहाकार; पण 'या' देशात आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नाही, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 16:52 IST

या देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे.

Corona News: कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली आणि आता पुन्हा एकदा याच देशातून कोरोना झपाट्याने वाढ घेत आहे. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, उपचारासाठी औषधे नाहीत, मृत्यूनंतर स्मशानभूमीतही जागा मिळत नाहीयेत. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. चीननंतर अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानमध्येही केसेस वेगाने वाढत आहेत. भारतामध्येही केंद्र आणि सर्व राज्य सरकारे अलर्टवर आहेत. पण जगात असाही एक देश आहे, जिथे महामारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे.

196 देशांपैकी एकमेव देश सुरक्षित राहिलावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या यादीतील 196 देशांपैकी एकच देश असा आहे, जिथे कोरोना पोहोचला नाही. तुर्कमेनिस्तान हे या देशाचे नाव आहे. WHO च्या अहवालानुसार, 3 जानेवारी 2022 ते 23 डिसेंबर 2022 पर्यंत तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, 3 सप्टेंबर 2022 पर्यंत येथे एकूण 1 कोटी 35 लाखांहून अधिक लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.

कोरोना इथपर्यंत का पोहोचला नाही?2020 पासून म्हणजेच कोरोना चीनमधून जगभर पसरू लागला, तेव्हापासून तुर्कमेनिस्तानने सर्वप्रथम एअरलाइन्सवर लगाम घट्ट केला. महामारीच्या सुरुवातीला इथल्या सरकारने थायलंड आणि बीजिंगला जाणाऱ्या फ्लाइटवर बंदी घातली होती. इतकेच नाही तर सुरुवातीच्या टप्प्यातच तुर्कमेनिस्तानने चीन आणि थायलंडला विमाने पाठवून तेथील लोकांना बाहेर काढले होते. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांची येथे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आणि लोकांनीही ती स्वीकारली.

सर्व विमाने एकाच विमानतळावर आणलीतुर्कमेनिस्तानने फेब्रुवारी 2020 पासून जगातील कोणत्याही देशात जाण्यासाठी प्रवासावर बंदी घातली आहे. विशेषत: ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मार्चमध्ये तीन परदेशी मुत्सद्दींचे विमान तेथे पोहोचल्यावर तेही परत करण्यात आले. देशात येणारी सर्व अत्यावश्यक उड्डाणे एकमेव तुर्कमेनाबत आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली. येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे त्यांना विमानतळावरील खास बांधलेल्या रुग्णालयांमध्ये अलग ठेवण्यात आले होते.

लसीकरण मोहिम राबवलीतुर्कमेनिस्तानने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. ज्या विमानांमध्ये मदत साहित्य आणि अत्यावश्यक लोक होते, अशा विमानांनाच देशात प्रवेश करण्याची परवानगी होती. मुख्य विमानतळ लोकसंख्येपासून दूर असल्याने संसर्ग शहरी लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्याच्या जवळ रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली होती. देशात एक विशेष वैद्यकीय गट तयार करण्यात आला, ज्याचे काम फक्त कोविडपासून बचावासाठी संपूर्ण व्यवस्था करणे हे होते. या गटाने आपली जबाबदारी तत्परतेने पार पाडली. जगभरात कोविडचे रुग्ण थांबल्यानंतर जेव्हा लसीची पाळी आली तेव्हा तुर्कमेनिस्तान सरकारने लसीबाबत तत्परता दाखवली. 3 सप्टेंबर 2022 पर्यंत येथे एकूण 1 कोटी 35 लाखांहून अधिक लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयchinaचीन