शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'या' देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान, परिस्थिती बिघडली; USमध्ये रोज होतायत सरासरी 1800 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 1:57 PM

येथे रुग्णालयातील बेडही कमी पडू लागले आहेत. तसेच यावेळी ख्रिसमस, बॉक्सिंग डे आणि न्यू इयर निर्बंधातच पार पडेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

वॉशिंग्टन - कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात थैमान घालायला सुरुवात केली आहे. माध्यमांतील आकडेवारीनुसार, जगातील कोरोना रुग्णांची संख्या आता जवळपास 6.62 कोटींवर पोहोचली असून 4 कोटी 57 लाखहून अधिक लोक बरे झाले आहेत. तर 15 लाख 23 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचे दिसू लागले आहे. येथे शुक्रवारी 993 जणांचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथे रुग्णालयातील बेडही कमी पडू लागले आहेत. तसेच यावेळी ख्रिसमस, बॉक्सिंग डे आणि न्यू इयर निर्बंधातच पार पडेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

इटलीत सरकार हतबल -युरोपातील देशांत जशी परिस्थिती मार्च आणि एप्रिल महिन्यात होती, साधारणपणे तशीच परिस्थिती पुन्हा एकदा तयार होऊ लागली आहे. फ्रान्स आणि जर्मनीने कठोर निर्बंध आणि लॉकडाउनच्या मदतीने काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र इटलीत असे नाही. येथे शुक्रवारी 993 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 58 हजार जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. इटली सरकारने म्हटले आहे, की रुग्णालयांतील बेड कमी होत चालले आहेत. उत्सवांच्या काळात निर्बंध अधिक कठोर होतील आणि लोकांना घरी राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल.

अमेरिकेतील स्थितीही हाताबाहेर -कोरोनामुळे अमेरिकेतील स्थितीही पुन्हा एकदा खराब होताना दिसत आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, येथे या आठवड्यात सरासरी रोज 1800 जणांचा मृत्यू झाला आणि एप्रिलनंतरची ही सर्वात धोकादायक स्थिती आहे. ज्यो बायडन यांनी ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशनवर आरोप केला आहे, की त्यांनी लशीच्या वाटपासाठी योग्य नियोजन केले नाही. यामुळे राज्यांना त्रास होत आहे. बायडन म्हणाले, माझ्या टीमला अद्याप सविस्तर प्लॅन मिळालेला नाही. आम्हाला लस आणि सिरिंज कंटेनर्सची वाट पाहावी लागत आहे. ट्रम्प यांच्या कोरोना टास्क फोर्समध्ये असलेल्या डॉ. अँथोनी फौसी यांनी आपल्या कोरोना टीमचा भाग व्हावे, असे आवाहन बायडन यांनी केले आहे. मात्र, फौसी यांनी यावर अद्याप कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही.

ऑस्ट्रेलियात परिस्थितीवर नियंत्रण -ऑस्ट्रेलियामध्ये जनतेचा संयम आणि सरकारच्या उपाययोजनांचा परिणाम दिसू लागला आहे. न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया सर्वाधिक प्रभावित होते. मात्र, येथील स्थिती आता नियंत्रणात आहे. तर भारताचा विचार करता भारतात आतापर्यंत तब्बल 9608418 जणांना कोरोनाची लागण झाली असून 139736 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9058003 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाItalyइटलीJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतFranceफ्रान्स