ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! ICU बेड संपले, रुग्णांवर खुर्च्यांवर बसवून उपचार घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 22:09 IST2021-03-29T22:08:10+5:302021-03-29T22:09:56+5:30
Corona In Brazil: अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो. सध्या ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार! ICU बेड संपले, रुग्णांवर खुर्च्यांवर बसवून उपचार घेण्याची वेळ
Corona In Brazil: अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो. सध्या ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी २४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले असून ३ लाख १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील याच देशात होत आहेत. त्यात देशातील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे. देशातील २६ पैकी १६ राज्यांमध्ये आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. ९० टक्के आयसीयू बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत. रिओ ग्रँड डो सुल येथे तर आयसीयू केअर युनिटमध्ये दाखल होण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांत वेटिंग लिस्ट तब्बल दुपटीनं वाढली आहे. बेड्सच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना चक्क खुर्च्यांवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत.
रुग्णालयात गंभीर स्वरुपाचे आणि ऑक्सिजनची कमतरता असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. दक्षिण ब्राझीलमधील सर्वात समृद्ध शहर म्हणून ओळख असलेलं पोर्टो एलेग्रे येथील रुग्णालयात याआधीपासूनच युवा आणि गंभीर स्वरुपाचे रुग्ण येत आहेत. तर दुसरीकडे स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यविधीसाठी रांगा लागलेल्या पाहयला मिळत आहेत.