शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” केम्ब्रिजमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 10:52 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात आयडियाज फॉर इंडिया या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आयडियाज फॉर इंडिया परिषदेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे. त्यासाठी आम्ही लढतोय. तर भाजप आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसंच चीन बाबत बोलतानाही राहुल गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

“पूर्वीसारखा भारत परत मिळवण्यासाठी आमचा पक्ष लढत आहे. परंतु भाजपकडून लोकांचा आवाज दाबला जातो. आम्ही लोकांचा आवाज ऐकण्यासाठी काम करत आहोत,” असं राहुल गांधी म्हणाले. ज्यांनी देशाच्या निर्मितीचं काम केलं, त्या संस्थांवर हल्ले होत आहेत, त्यावर डीप स्टेटचा कब्जा असल्याचंही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. अंतर्गत कलहाचा सामना - राहुल गांधी“काँग्रेसची ही लढाई आता वैचारिक लढाई आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघाला भारत एक भूगोलाप्रमाणे दिसत आहे. परंतु काँग्रेससाठी भारत हा लोकांनी बनतो,” असं ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसला अंतर्गत कलह, पक्ष बदल आणि निवडणूकांमध्ये पराभव अशा गोष्टांना सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

“ध्रुवीकरणामुळे सत्तेत”“भाजप सरकारच्या काळात रोजगार कमी झाले आहेत. असं असूनही ध्रुवीकरणामुळे ते सत्तेत राहिलेत. आज भारतात परिस्थिती चांगली नाही. भाजपने चहुबाजूंना रॉकेल शिंपडले आहे,” असंही राहुल गांधी म्हणाले. आमच्याकडे एक असा भारत आहे, जेथे निरनिराळे विचार मांडता येतील आणि आपण चर्चाही करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.“प्रत्येक संस्थांवर सरकारचा कब्जा झाला आह. प्रत्येक संस्थांवर हल्ला केला जात आहे. आमच्याकडे भाजपसारखा उमेदवार आहे असं लोक म्हणतात. जर आपण भाजपसारखा उमेदवार आहे असं म्हटलं तर आपण भाजपच होऊ. भाजप आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वांचा आवाज ऐकतो. आम्ही लोकांना ऐकण्यासाठई आहोत,” असं लोकशाही विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारत