शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

फ्रान्समध्ये आर्थिक सुरक्षेमुळे लॉकडाऊनचे पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 3:51 AM

पाच ते सहा लाख लोकसंख्येच्या ग्रेनोबल शहरात मी राहते. येथे ५०० ते ६०० भारतीय आहेत. त्यात काही कायमस्वरूपी, शिक्षणासाठी, तर काही तात्पुरते रहिवासी आहेत.

फ्रान्समध्ये नागरिकांच्या संचारावर सरसकट निर्बंध नाहीत. आवश्यक उद्योग सुरू आहेत. तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर जाण्यास परवानगी आहे. काही उपाहारगृहेसुद्धा सुरू आहेत. केवळ पार्सल मिळते. बसून खाता येत नाही. अन्य नागरिकांनी घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फ्रान्सच्या ग्रेनोबल शहरातून मिथिला उनकुले यांचे अनुभव खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी..पाच ते सहा लाख लोकसंख्येच्या ग्रेनोबल शहरात मी राहते. येथे ५०० ते ६०० भारतीय आहेत. त्यात काही कायमस्वरूपी, शिक्षणासाठी, तर काही तात्पुरते रहिवासी आहेत. उच्च शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी अभ्यासाबरोबरच अर्धवेळ काम करून उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि अन्य गरजू भारतीयांना आर्थिक मदत करण्यासाठी येथील भारतीय पुढाकार घेत आहेत. माझ्या दैनंदिन जीवनावर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झालेला नाही. ग्रेनोबलच्या विद्यापीठात पर्यावरणशास्त्र या विषयात मी पीएचडी करीत असून, कॉम्प्युटर डाटाचे विश्लेषण करते. त्यामुळे घरूनच काम करीत आहे, असे मिथिला सांगतात.असा आहे दंडएक तास घराबाहेर पडण्याची मुभा आहे. चालणे, धावणे, पाळीव प्राण्याला फिरण्यास नेणे, यासाठी नागरिकघरापासून एक किलोमीटर परिसरातबाहेर पडू शकतात. मात्र, एक प्रतिज्ञापत्र सोबत बाळगावे लागते. ज्यात आपलापत्ता, बाहेर निघण्याची वेळ, तारीख आणि कारण हे नसल्यास आणि पहिल्यांदा पकडले गेल्यास १३५ युरो (साधारण११ हजार रुपये) दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा ४५० युरो (साधारण ३६ हजार रुपये), तर एका महिन्यात तिसºयांदा पकडले गेल्यास ३७५० युरो (३ लाख रुपये)आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास, असा जबर दंड आहे....म्हणून नागरिक घरात थांबतातसरकारकडून नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यात आली आहे. किरकोळ विक्री क्षेत्रात नोकरी गमावलेल्यांना त्यांच्या पगाराच्या ८४ टक्के रक्कम सरकार देते. छोट्या उद्योगांना मासिक भाडे, वीज व पाणीदेयक, तसेच ठरावीक कर माफ करण्यात आले आहेत.देशवासीयांनो, बेफिकीर राहू नकाफ्रान्स, इटली, स्पेनमध्ये निर्बंध असूनही कोरोना व्हायरसची बाधा वाढतेच आहे. १२ एप्रिलपर्यंत फ्रान्समध्ये एक लाखाहून अधिक बाधित झाले, तर १४ हजार जणांचा बळी गेला. इतर देशांच्या तुलनेत भारताने प्रारंभिक टप्प्यातच लॉकडाऊन केल्याने अनेक दुष्परिणाम टळण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनचे पालन करा. घाबरायचे कारण नसले, तरी बेफिकीर राहूनही चालणार नाही, असे मिथिला यांनी नमूद केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्स