शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 16:15 IST

पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत.नारोवाल जिल्ह्यातील कमर रियाज यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री ख्वाजा आसिफ यांना सर्वधर्म समभाव म्हणणे चांगलेच महागात पडले आहे. तहरीक ए-इन्साफ पक्षातील एका स्थानिक नेत्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ख्वाजा आसिफ यांनी ईश-निंदा केल्याचा आरोप इम्रान खानच्या पक्षातील नेत्याने केला आहे. 

पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत. पाकिस्तानातील मुस्लीम लीग या पक्षाचे नेते ख्वाजा आसिफ यांनी संसदेतील भाषणावेळी कुठलाही धर्म लहान किंवा मोठा नसल्याचे म्हटले होते, सर्व धर्म समभाव, असे वक्तव्य आसिफ यांनी केले होते. ख्वाजा आसिफ म्हणाले की, जे लोक इस्लामाबाद येथे मंदिर बनविण्यासाठी विरोध करत आहेत, ते हेच लोक आहेत. ज्यांनी देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना काफिरे आजम असं म्हटलं होतं. हे लोक त्यांच प्रतिनिधित्व करत आहेत, ज्यांच्यावर जिन्ना विश्वास ठेवत. अल्पसंख्यांकांच्या अधिकाराचे संरक्षण करणे ही इस्लामिक परंपरा आहे. इस्लामी सत्तेत अल्पसंख्यांकांना कधीही असुरक्षित वाटले नाही. सन 1980 च्या काळातील कट्टरपंथीयांनी पाकिस्तानची परंपराच नष्ट केली आहे. समाजात सहिष्णुता आणि बंधुप्रेमा वाढविणे ही नेत्यांची जबाबदारी आहे, असेही आसिफ यांनी म्हटले होते.

याप्रकरणी नारोवाल जिल्ह्यातील कमर रियाज यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. व्यवसायाने वकिल असलेल्या रियाज यांनी टीव्हीवर आसिफ यांचे वक्तव्य पाहिल्यामुळे भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. कुराणमध्ये, इस्लाम धर्मच सर्वात महान असल्याचं म्हटलंय, असेही रियाज यांनी स्पष्टीकरण दिले. त्यामुळे, सर्व धर्म समभाव असं म्हणणं इस्लामविरोधी आहे, असेही कमर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, हे शरिया कायद्यानुसारही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.  दरम्यान, पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी ट्विट करुन आसिफ यांचे समर्थन केले आहे. समानता ही पाकिस्तानच्या संविधानाची मूळ तत्वे आहेत. इस्लाममध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकार आणि स्वतंत्र्याची मूळ व्याख्या आहे, असेही शरीफ यांनी म्हटले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिसIslamइस्लामImran Khanइम्रान खान