शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केल्याप्रकरणी इसमाने स्वत:विरोधात दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 18:27 IST

या इसमाला नशा इतकी जास्त झाली की त्याला फोनवर बोलणंही कठीण झालं होतं. त्याही परिस्थितीत त्याने पोलिसांना फोन केला.

ठळक मुद्देतुम्ही एखादा नियम मोडलात तर कधी स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधीन झाला आहात का? मुळात नियम मोडणारे कधीच स्वत:ची चुक कबूल करत नाहीत. पण जगाच्या पाठीवर एक असा प्रकार घडलाय. एक इसम ड्रंक आणि ड्राईव्ह करत होता आणि त्याविरोधात त्यानेच स्वत:ची तक्रार केली आहे.

फ्लॉरिडा : तुम्ही एखादा नियम मोडलात तर कधी स्वत:हूनच पोलिसांच्या स्वाधीन झाला आहात का? मुळात नियम मोडणारे कधीच स्वत:ची चुक कबूल करत नाहीत. पण फ्लॉरिडामध्ये एक प्रकार असा घडलाय जो ऐकून तुम्हाला प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे यावर विश्वास बसेल. एक इसम ड्रंक आणि ड्राईव्ह करत होता आणि त्याविरोधात त्यानेच स्वत:ची तक्रार केली आहे. सध्या हा फोनकॉल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

इतर गुन्हेविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतल्या फ्लॉरिडा शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला मिशेल लेस्टर हे दारू पिऊन गाडी चालवत होते. खूप  प्रमाणात दारू प्यायल्याने त्यांना गाडी चालवणं अवघड झालं होतं. तसंच दारु पिऊन गाडी चालवणं नियमबाह्य असल्याने पोलिसांनी अटक करण्याआधी आपणच पोलिसांच्या स्वाधिन झालं पाहिजे यासाठी त्यांनी ९११ या इमरजन्सी क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या महिलेने तुम्ही कोणत्या संकटात सापडला आहात असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी दारू पिऊन गाडी चालवत आहे. त्यांना दारूची नशा एवढी चढली होती की फोनवर नीट बोलताही येत नव्हतं. त्यामुळे समोरच्या महिलेला सतत प्रश्न विचारावे लागत होते. त्यानंतर हळूहळू त्या इसमाने आपण दारू पिऊन गाडी चालवत असल्याची कबुली दिली. आपल्या चुकीची स्वत:हून कबुली दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर ऑपरेटरने विचारलं की, “तुम्ही कुठे आहात?’ तेव्हा ते म्हणाले की, ‘मला काहीच माहिती नाही, मी कुठे आहे. मला प्रचंड नशा चढली असून मला कसलंच भान नाहीए.’ दारूच्या नशेत ते रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गाडी चालवत असल्याचंही अनेकांनी पाहिलं. अपघात होऊन कोणालाही इजा होऊ नये याकरताच त्यांनी इमरजन्सी क्रमांकावर संपर्क साधला. त्यामुळे पुढे होणारी दुर्घटना टळली. पाहा व्हिडीयो - 

आणखी वाचा - VIDEO : भारतातल्या ‘या’ ठिकाणी डोळे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो सेफ्टी पिन

पोलिसांनी मिशेल यांना अटक केली असून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेला गाडी चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिशेल यांचा फोनकॉलही सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलाय. इतरांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करू नये याकरता हा व्हिडिओ टाकला असला तरीही अनेक नेटिझन्सने या फोनकॉलवर हास्याची झोड उठवलीय.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrimeगुन्हाtraffic policeवाहतूक पोलीस