कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 09:43 IST2025-09-23T09:42:50+5:302025-09-23T09:43:30+5:30
चीनमध्ये एका कंपनीची मालकीन एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले. तिने कर्मचाऱ्याच्या घटस्फोटासाठी मोठी रक्कम मोजली आहे.

कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
ऑफिसमध्ये तुम्ही अफेअरची प्रकरण पाहिली असतील. काही दिवसापूर्वी एचआर आणि सीईओच्या अफेअरचे प्रकरण चर्चेत होते. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका कंपनीची मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले. हे प्रकरण चीनमधील आहे. कर्मचाऱ्याच्या घटस्फोटासाठी ३० लाख युआन (३७.२ दशलक्ष रुपये) भेट म्हणून दिले. त्या व्यावसायिक महिलेचे नाव 'शू' आहे.
ही घटना चीनमधील चोंगकिंग येथील आहे. 'ही' नावाचा एक कर्मचारी नुकताच 'शू' कंपनीत सामील झाला होता. या काळात दोघांमध्ये प्रेम झाले. 'ही' आधीच विवाहित होता. त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटासाठी दिले पैसे
घटस्फोटाच्या बदल्यात त्याला त्याची पत्नी आणि मुलाला ३० लाख युआन द्यावे लागले. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. शूने त्याच्या मदतीला धावून येऊन लगेच त्याला ३० लाख युआन दिले, जेणेकरून त्याचा घटस्फोट सुरळीत होईल आणि ते कायमचे एकत्र राहू शकतील.
पैसे परत मागितले
पण, या प्रकरणात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा १ वर्ष एकत्र राहिल्यानंतर 'शू' ला वाटले की 'ही' तिच्यासाठी परफेक्ट लाइफ पार्टनर नाही. अशा वेळी 'शू' ने आपले पैसे परत मागायला सुरुवात केली. पहिल्या ट्रायलमध्ये कोर्टाने 'ही' ला पैसे परत देण्याचा आदेश दिला होता, पण दुसऱ्या ट्रायलमध्ये हा निर्णय उलटवला गेला.
कोर्टाचा निर्णय
'ही' आणि त्याची माजी पत्नी यांनी न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली होती. 'शू' न्यायालयात हे सिद्ध करू शकली नाही की तिने 'ही' ला पैसे दिले होते. त्यामुळे न्यायालयाने 'ही' च्या बाजूने निर्णय दिला. आता हे प्रकरण चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कर्मचाऱ्यासोबत अफेअर करून त्याचे लग्न मोडल्याबद्दल अनेक युजर्स 'शू' वर टीका करत आहेत.