शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मार्क झुकेरबर्ग मोस्ट वॉन्टेड? कोलंबिया पोलिसांच्या स्केचने खळबळ; 'ती' पोस्ट जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 15:11 IST

Columbia police on a lookout for suspect resembling Mark Zuckerberg : कोलंबिया पोलिसांनी एक पोस्ट केली असून त्यातील स्केचने खळबळ उडाली आहे. पोलीस एका आरोपीचा शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. कोलंबिया पोलिसांनी एक पोस्ट केली असून त्यातील स्केचने खळबळ उडाली आहे. पोलीस एका आरोपीचा शोध घेत आहेत. ज्याचा चेहरा हा फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गशी (Mark Zuckerberg) अगदी मिळताजुळता आहे. कोलंबिया पोलिसांनी फरार आरोपीचे स्केच जारी केले आहे. तसेच या आरोपीची माहिती देणाऱ्याला मोठं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. आरोपीला अटक करण्यास मदत करणाऱ्यास 3 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 22 कोटी 30 लाख 86 हजार रुपये मिळणार आहेत. पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरून याबाबत माहिती दिली आहे. 

पोलिसांनी दोन आरोपींचे स्केच हे व्हायरल केले आहेत. तसेच त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती देखील दिली आहे. या आरोपींना शोधण्यासाठी आमची मदत करा असं पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे. कोलंबियन नॅशनल पोलिसांचं 'पोलिसिया नॅशनल डी लॉस कोलम्बियानो' नावाने एक फेसबुक पेज आहे. त्यावर ही पोस्ट करण्यात आली होती. तसेच यासाठी तीन मिलियन डॉलरचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं. यातील एका आरोपीचं स्केच हे हुबेहुब मार्क झुकेरबर्ग यांच्याशी जुळत असल्याने सोशल मीडियावर याबाबत तुफान चर्चा रंगली आहे. 

पोलिसांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. यावर 66 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच ती 22 हजारांहून अधिक वेळा शेअर करण्यात आली आहे. तर काही लोकांनी मार्क झुकेरबर्गचाच फोटो पोस्ट करून कमेंटमध्ये त्यांना टॅग देखील केलं आहे. रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात कोलंबियाचे राष्ट्रपती इवान डुके यांच्या हेलिकॉप्टरवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामुळे हेलिकॉप्टरचे किरकोळ नुकसान झाले. हेलिकॉप्टरमध्ये डुके यांच्यासह संरक्षण मंत्री डिएगो मोलानो, गृहमंत्री डॅनियल पलासियोस आणि नॉर्ट डी सँटेंडर राज्याचे राज्यपाल सिल्वानो सेरानो होते. 

पायलटने सुरक्षितपणे लँडिंग करून सर्वांचा जीव वाचवला. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हेलिकॉप्टरवर गोळीबार करणाऱ्यांना काहींनी पाहिले असल्याचे चौकशीत समोर आले. हा गोळीबार दोघांनी केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपींची स्केच तयार केली. मात्र, त्यातील एका आरोपीचा चेहऱ्याचे स्केच चक्क मार्क झुकेरबर्गच्या चेहऱ्याशी साम्य दाखवणारे आहे. त्यामुळे पोलिसांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुकPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया