शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:45 AM

काश्मिरात भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी काही काश्मिरी लोकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.

इस्लामाबाद : काश्मिरात भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी काही काश्मिरी लोकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे. ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानी यांच्यासारखे दहशतवादी हे पाकिस्तानात हीरो होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.पाकिस्तानातील एक राजकीय नेते फरतुल्लाह बाबर यांनी बुधवारी टष्ट्वीटरवर शेअर केलेल्या तारीख नसलेल्या क्लिपमध्ये मुशर्रफ असे म्हणताना दिसत आहेत की, १९७९ मध्ये आम्ही पाकिस्तानला लाभ देण्यासाठी अफगाणिस्तानत धार्मिक दहशतवाद सुरू केला. जगभरातून मुजाहिदीन आणले. त्यांना प्रशिक्षित केले. शस्त्रास्त्रे पुरविली. ते आमचे हीरो होते. हक्कानी आमचा हीरो होता. ओसामा बिन लादेन आमचा हीरो होता. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. नायकांनी खलनायकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. काश्मीरमधील अशांततेबाबत ते म्हणाले की, काश्मिरातून येणाऱ्यांचे येथे स्वागतच झाले. त्यांना आम्ही प्रशिक्षित करीत होतो. त्यांचे समर्थन करीत होतो. भारतीय सैन्यासोबत लढू इच्छिणाऱ्यांना आम्ही त्यांना मुजाहिदीन मानले.

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर