पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमा संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. गुरुवारी रात्री अफगाणिस्तानने केलेल्या पलटवारानंतर पाकिस्तानने पुन्हा मोठी लष्करी कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानच्या २२ लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत सुमारे २७४ तालिबानी ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर १२ पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झल्याची कबुली पाक लष्कराने दिली आहे.
आतापर्यंत २७४ अफगाण सैनिक मारले गेले -यासंदर्भात माध्यमांशी बोलताना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी म्हणाले, संपूर्ण कारवाई पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. आतापर्यंत २७४ अफगाण सैनिक मारले गेले आहेत, तर पाकिस्ताननेही १२ सैनिक गमावले आहेत. पाकिस्तानी लष्कराव्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे. यात, अफगाण तालिबानने आणखी कोणत्याही चिथावणीखोर कृतीत सहभाग घेतला तर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असे म्हण्यात आले आहे.
सीमाभागात तणाव - -गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान सातत्याने अफगाणिस्तानवर टीटीपी (TTP)च्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करत आहे. ताज्या माहितीनुसार, तोरखम सीमा भागात रात्रभर गोळीबार आणि बॉम्बफेकीचे आवाज ऐकू येत होते. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाण सैनिकही आता सीमेच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. स्थानिक नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
Web Summary : Pakistan and Afghanistan border conflict intensifies, leading to military actions. Pakistan claims 274 Taliban fighters killed in strikes on 22 bases. Twelve Pakistani soldiers also died. Tensions rise as both sides mobilize forces, displacing civilians. The situation teeters on the brink of war.
Web Summary : पाकिस्तान और अफ़गानिस्तान सीमा पर संघर्ष तेज़, सैन्य कार्रवाई। पाकिस्तान का दावा है कि 22 ठिकानों पर हमलों में 274 तालिबानी मारे गए। बारह पाकिस्तानी सैनिक भी मारे गए। दोनों तरफ से सेना जुटाने से तनाव बढ़ा, नागरिक विस्थापित। स्थिति युद्ध के कगार पर है।